Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार

01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार
30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 9:28 AM

औरंगाबादः राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना (New Voters Registration) नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी केंद्राकडे धाव घ्यावी लागणार आहे.

09 वॉर्डात नोंदणी सहाय्यता कक्ष

महापालिकेच्या क्षेत्रातील 9 वॉर्डांमध्ये मतदार यादीतील दुरुस्त्यांकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी केंद्र स्तरीय अधिकारी, पालिकेचे 315 कर्मचारी हे दुबारनोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी व त्रुटी असलेली नावे दुरुस्त करतील. 13, 14,15 नोव्हेंबर तसेच 27,28 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी नोंदणी करावी

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी नव मतदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच 01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

नोंदणीसाठी कुठे आहेत सुविधा?

महापालिकेतील मतदाराला मतदार नोंदणी सुलक्ष करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात, ग्राहक सेवा केंद्रात नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार कार्यालयात ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे.

दोन वर्षात वाढले 50 हजार मतदार

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 28 लाख 99 हजार 110 मतदार असून यात 15 लाख 29 हजार 461 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर 13 लाख 69 हजार 699 हजार 619 मतदार महिला आहेत. तसेच 30 इतर मतदारांचाही समावेश आहे. मागील दोन वर्षात 50 हजार मतदार वाढले आहेत. इतर बातम्या-

औरंगाबादेत जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध, नोव्हेंबर अखेरपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होणार

लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.