दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार, हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर

मराठवाड्यात एवढा मोठा पाऊस खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच पडला. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार झाला असं म्हणावं लागेल. कारण धुव्वाधार आणि रेकॉर्डब्रेक पावसाने हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर येऊ लागलं आहे.

दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार, हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर
हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 8:43 AM

औरंगाबाद : गेल्या आठवड्यात दुष्काळी मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने दाणादाण उडवली. शेतांना तळ्याचं स्वरुप आलं. उभी पीकं पाण्याखाली गेली. शेतातील माती वाहून गेली. मराठवाड्यात एवढा मोठा पाऊस खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच पडला. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार झाला असं म्हणावं लागेल. कारण धुव्वाधार आणि रेकॉर्डब्रेक पावसाने हजारो फूट बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर येऊ लागलं आहे.

दुष्काळी मराठवाड्यात चमत्कार

मराठवाड्यात तब्बल 8 दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. इतकंच नाही तर शेतात असलेल्या बोअरवेल मधून सुद्धा आपोआप पाणी कोसळू लागले आहे. ज्या मराठवाड्यात पाणी काढण्यासाठी हजरो फूट खोल बोअरवेल पाडले जात होते आज त्याच ठिकाणी जमिनीतून बोअरवेलवाटे पाणी बाहेर येऊ लागले आहे. हा दुष्काळी मराठवाड्याच्या दृष्टीने एक चमत्कार समजला जात आहे.

मराठवाड्यातील प्रत्येक धरण, बंधारा ‘ओव्हरफ्लो’

मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण, बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 60-70 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे सप्टेंबरच्या अखेरीस प्रत्येकी 6 इंच उघडण्याची वेळ या अतिवृष्टीने आली आहे. त्यामुळे प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत आहे.

दुष्काळी मराठवाड्याचं थरकार उडविणारं चित्र

धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे हे दुसरे रूप थरकाप उडविणारे आणि काळजी वाढविणारे आहे.

मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग सगळं पाण्याखाली!

मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालंय. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे  निदर्शनास येत आहे. त्यांना आता तिथे काही दिवस शेतीही करणं शक्य होणार नाही.

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

(In drought prone Marathwada, water automatically flows out of thousands of feet of borewells maharashtra Rain news)

हे ही वाचा :

महाराष्ट्रात संकटांची मालिका, मराठवाडा जलमय, केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.