औरंगाबाद : प्रसिद्ध खुलताबाद ऊरुसात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत, यात्रा रद्द, बालक व वृद्धांना घरीच थांबण्याचे आवाहन
औरंगाबादः आजपासून खुलताबाद (Khultabad Urus) येथील प्रसिद्ध ऊरूसाला सुरुवात होत आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत या ऊरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी असणाऱ्या उरुसासाठी कोरोनाच्या काळात गर्दी होवू नये या साठी नियमांचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी दर्गा कमीटी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर यात्रा कार्यक्रम दुकाने सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती […]
औरंगाबादः आजपासून खुलताबाद (Khultabad Urus) येथील प्रसिद्ध ऊरूसाला सुरुवात होत आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत या ऊरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी असणाऱ्या उरुसासाठी कोरोनाच्या काळात गर्दी होवू नये या साठी नियमांचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी दर्गा कमीटी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर यात्रा कार्यक्रम दुकाने सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक निमीत गोयल आणि निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी दर्गा कमीटीचे सदस्य हुसनुद्दीन, महमंद नईम, शफुदीन रमजानी, महमद नईम, यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
यावेळी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, दरवर्षी होणारे सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच रातपाळणे, दुकाने दरवर्षी भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे भाविकांना केवळ दर्शन घेता येणार आहे. तसेच बारा तारखेला हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष यांचे समाधिस सकाळी नऊ वाजता कमी संख्येने निवडक व्यक्तीस उपस्थितीत चुना लावण्यात यावा. तर १३ तारखेला समाधीवरील पवित्र कपडे स्वच्छ केले जातात. या विधीस १५० व्यक्तीच्या उपस्थितीसह परवानगी असणार आहे. १४ तारखेला मिलाद धार्मीक विधीस जास्तीत जास्त १५० व्यक्तीच्या उपस्थितीत परवानगी असणार आहे.
संदलच्या कार्यक्रमाला पंधरा व्यक्तींना परवानगी
संदलच्या कार्यक्रम धार्मिक विधी व मिरवणुकीचा कार्यक्रम सांयकाळी चार वाजता असणार असून यासाठी पंधरा व्यक्तीची परवानगी असणार आहे. तर पंधरा तारखेच्या चिरागण या कार्यक्रमात पवित्र समाधी व दर्गाह येथे दिवे लावून सदर परिसर प्रकाशमान केला जातो. या कार्यक्रमासाठी देखील 150 लोकांची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी हदगल यांनी दिली आहे.
विना मास्क प्रवेश नाही
दरम्यान, उरुसात फक्त भाविकांनी दर्शन घेण्यासाठी यावे. तसेच विनामास्क प्रवेश दिला जाणार नाही. साठ वर्षाच्या वरच्या व्यक्तीनी ऊरुसात येऊ नये. तसेच 10 वर्षाच्या खालच्या मुलांना देखील आणू नये. कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे सर्व नियमांचे पालन करत दर्शनासाठी येण्याचे आवाहन त्यांनी केले. तर महमद नईम यांनी सांगितले की, या उरुसाचे हे 735 वे वर्ष आहे. लोकांची मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करु नये. तसेच सर्व नियमांचे पालन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्या-
तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत