Marathwada Rain | मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, हजारो जनावरे पुरात गेली वाहून…
यंदाच्या या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पुरामुळे शेतातील मातीही वाहून गेल्याच्या घटना पुढे आल्या. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने चांगली आलेली पिके जळून गेलीत. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
मुंबई : यंदा राज्यात दमदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. यामुळे जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर आल्याच्या घटना देखील घडल्या. दरवेळीपेक्षा यंदा चांगला पाऊस राज्यात झालायं. पुढील काही दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत मराठवाड्यातील तब्बल 52 जणांचा मृत्यू (Death) झालायं. इतकेच नाही तर सततच्या पावसामुळे शेतींचे आणि पिकांचे देखील मोठे नुकसान (Damage) झाले. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाहीयं.
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आकडा पुढे आलायं. यावर्षीच्या पावसात हजारो जनावरे पुरात वाहून गेली तर वीज पडूनही अनेक जनावरांचा मृत्यू झालायं. निसर्गाच्या या रुद्र रूपाने यंदाच्या पावसाळ्यात जून ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने 52 व्यक्ती दगावल्याची माहित दिलीयं. तसेच पुढील काही दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
लाखो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान शेतकरी राजा हवालदिल
यंदाच्या या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पुरामुळे शेतातील मातीही वाहून गेल्याच्या घटना पुढे आल्या. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने चांगली आलेली पिके जळून गेलीत. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांपर्यत अद्यापही कोणतीही मदत पोहचली नाहीयं. शासनकर्ते फक्त मोठ्या घोषणा करतात मदत नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.