बाप रे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा पुन्हा घाव, वाचा मराठवाड्यातले भाव!

औरंगाबादेत डिझेल 98.81, बीड- 97.03, हिंगोली 96.98, लातूर 97.01, नांदेड 98.23, उस्मानाबाद 96.36, परभणी 98.43, आणि जालना 97.14 प्रती लीटर असे सध्या भाव आहेत.

बाप रे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा पुन्हा घाव, वाचा मराठवाड्यातले भाव!
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 2:38 PM

औरंगाबाद: शहरातील पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel price) दरात  दरात सप्टेंबर महिन्याअखेर आणखी वाढ झाली आहे. शहरात सध्या पेट्रोलचे दर 109.01 रुपये प्रति लिटीर तर डिझेलचे दर 98.81 रुपये प्रति लीटर असे झाले आहेत. सप्टेंबर महिन्यातील 21 दिवस पेट्रोलचे दर स्थिर होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात पेट्रोलच्या दरात 89 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या भाववाढीनेही नवीन विक्रम (Record price hike) स्थापन केला आहे.

जुलैत पेट्रोल दरांनी गाठला होता उच्चांक

औरंगाबाद शहरात 17 जुलै 2021 रोजी पेट्रोलचे दर 109.18 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ही दरवाढ पेट्रोल विक्रीच्या इतिहासात सर्वात जास्त ठरली होती. त्यानंतर 21 ऑगस्ट पर्यंत पेट्रोलचे हे दर स्थिर होते. त्यानंतर 22 ऑगस्ट ते पाच सप्टेंबरच्या काळात पेट्रोलच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली. 6 सप्टेंबर रोजी पेट्रोलचे दर 108.60 रुपये एवढे नोंदले गेले. त्यानंतर पुन्हा दरवाढीचे सत्र सुरु झाले.

सप्टेंबरच्या अखेरच्या दिवसांत वाढ

27 सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली. तर 30 सप्टेंबरला 23 पैशांची वाढ झाली. या दोनच दिवसांत पेट्रोलच्या दरात 55 पैशांची वाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या भाववाढीने 109 रुपये प्रतिलीटरचा दर पार केला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पेट्रोलचे किती भाव?

औरंगाबाद- 109.01, बीड- 108.74, हिंगोली 108.67, लातूर 108.72, नांदेड 109.97, उस्मानाबाद 108.03, परभणी 110.21, आणि जालना 108.87 रुपये प्रतिलीटर असे पेट्रोलचे भाव सध्या सुरु आहेत.

डिझेलचे भाव कोणत्या जिल्ह्यात किती?

औरंगाबादेत डिझेल 98.81, बीड- 97.03, हिंगोली 96.98, लातूर 97.01, नांदेड 98.23, उस्मानाबाद 96.36, परभणी 98.43, आणि जालना 97.14 प्रती लीटर असे सध्या भाव आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असल्याची माहिती स्थानिक पंप विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इतर बातम्या-

Petrol-Diesel Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.