‘महाज्योती’च्या विभागीय कार्यालयाचे औरंगाबादेत उद्घाटन; ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना?

विद्यार्थी तसेच शेतक-यांसाठी अभिनव आणि नाविन्यपूर्ण योजनाच्या माध्यमातून महाज्योती या संस्थेने मागासवर्गींयांचा विकास साधण्यासाठी  महत्त्वपूर्ण काम केले आहे. आता औरंगाबाद येथे महाज्योतीचे कार्यालय सुरु झाल्यामुळे संस्थेच्या सर्व योजनांशी या परिसरातील नागरिकांना जोडण्यात येणार आहे.

‘महाज्योती’च्या विभागीय कार्यालयाचे औरंगाबादेत उद्घाटन; ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना?
औरंगाबाद येथील 'महाज्योती'च्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करताना मंत्री विजय वडेट्टीवार.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 6:21 PM

औरंगाबाद: महात्मा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे उद्घाटन औरंगाबाद येथे 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे झाले. बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ‘महाज्योती’ मुख्य कार्यालय नागपूर येथे असून आता औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत इतर मागास, बहुजन, भटक्या विमुक्त जामाती, शेतमजूर व शेतकरी यांच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण आणि कौशल्याधारित व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. औरंगाबादमधील खोकडपुऱ्यातील सामाजिक न्याय भवन इमारतीत हे कार्यालय आहे.

नागपूरनंतर औरंगाबादमध्ये ‘महाज्योती’चे काम विस्तारणार

‘महाज्योती’ अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, नागपूरला प्रथम स्थापना झाली. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेली महाज्योती ही संस्था इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, विमुक्त आणि भटक्या जाती-जमाती म्हणजे व्हीजेएनटी यासह विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसीच्या सर्वांगीण विकासाकरीता कटीबद्ध आहे. या तिन्ही क्षेत्रातील विद्यार्थी तसेच शेतक-यांसाठी अभिनव आणि नाविन्यपूर्ण योजनाच्या माध्यमातून महाज्योती या संस्थेने मागासवर्गींयांचा विकास साधण्यासाठी  महत्त्वपूर्ण काम केले आहे. आता औरंगाबाद येथे महाज्योतीचे कार्यालय सुरु झाल्यामुळे संस्थेच्या सर्व योजनांशी या परिसरातील नागरिकांना जोडण्यात येणार आहे.

विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी कोणत्या अनुदान योजना?

1.     यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी एकरकमी प्रत्येकी  रु. 25000/- अर्थसहाय्य करण्यात येते. जून 21 अखेर रोजी प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रु.12 लाख 50 हजार जमा करण्यात आलेले आहेत.

2.     पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना घरपोहोच  पुस्तक संच देण्यात आलेले आहे. याकरिता रु.19 लाख 50 हजार प्रत्यक्षात खर्च झाला वितरीत झाले आहेत.

3.     व्यावसायिक वैमानिक (कमर्शिअल पायलट) प्रशिक्षण अंतर्गत प्रथम वर्षी 20 विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब मार्फत व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

4.    Ph.D. करणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना रु.31,000/- प्रतिमाह अधिछात्रवृत्ती 5 वर्षाकरिता (Fellowship) देण्यात येणार आहे.

5.     M.Phil. करणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना रु.20,000/- प्रतिमाह अधिछात्रवृत्ती (Fellowship)

6.     MHT-CET /JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC व UPSC च्या एकूण 6000 उमेदवारांना Tablet व सीमकार्डाच वितरण.

7.     MPSC व UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी अंदाजे 10 हजार उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार असून त्याकरिता रक्कम रु. 25 लाख खर्च अपेक्षित आहे. निवड केलेल्या उमेदवारांना पुणे व दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये पूर्व व लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

8.     करडई व भुईमुग या तेलबिया उत्पादन व विक्री प्रकल्प हा प्रायोगिक तत्वावर नागपूर,अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला,यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्याकरिता शेतकऱ्यांना 15 हजार एकर क्षेत्रात करडई लागवड करण्याकरिता प्रोत्साहन योजना सुरु करण्यात येत आहे, या प्रकल्पांत येणारे उत्पादन हे महाज्योती विकत घेणार असून तेलबियांवर प्रक्रिया करून तेलाचा ब्रांड तयार करण्यात येणार आहे. विक्रीतून येणारा नफा हा शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. महाज्योतीची ही अभिनव व नाविन्यपूर्ण योजना असून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचे पाउल असणार आहे.

9.     MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण सुरु असून 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इंजिनीरिंग, मेडिकल आदी प्रोफेशनल कोर्सेस करिता प्रवेशासाठी वंचित विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

10.   सप्टेंबर 2021 नंतर 7000 उमेदवारांना नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, यात ईएमएस टेक्निशियन, टेक्निकल सपोर्ट इंजिनीअर, जनरल ड्युटी असिस्टंट, मेडिकल इमर्जन्सी टेक्निशियन आदी 20 कोर्सद्वारे सदर निवासी व अनिवासी स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर जॉब देण्यात येणार आहे.

11.   सनदी लेखापाल (CA) व कंपनी सचिव (CS) परीक्षेत इमाव, विजाभज व विमाप्र वर्गातील उमेदवारांचा टक्का वाढविण्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे ऑनलाईन तसेच निवासी स्वरूपाचे  प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे.

इतर बातम्या- 

आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, UPSC च्या यशाचा ‘नगरी पॅटर्न’, 4 पोरांचं भव्यदिव्य यश!

वडेट्टीवारांवर अडीच कोटीच्या घोटाळ्याचा आरोप; हा घोटाळा पचवू देणार नाही, प्रकाश शेंडगेंचा इशारा 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.