यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबाच्या नवरात्राला उत्साहात सुरुवात, साताऱ्यात पहिल्याच दिवशी 12 हजारांवर भाविकांनी घेतले दर्शन
औरंगाबादः मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या (Khandoba) नवरात्राला रविवारपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात जेजुरी हे खंडोबाचे महत्त्वाचे ठाण आहे. तर मराठवाड्यातील भाविक जेजुरीनंतर औरंगाबादमधील सातारा गावातील खंडोबाला श्रद्धास्थान मानतात. जिल्ह्यातील सातारा (Aurangabad Satara) गावातील प्राचीन खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच रविवारी श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या नवरात्राला उत्साहात सुरुवात झाली. खंडोबाचा एरवी […]
औरंगाबादः मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या (Khandoba) नवरात्राला रविवारपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात जेजुरी हे खंडोबाचे महत्त्वाचे ठाण आहे. तर मराठवाड्यातील भाविक जेजुरीनंतर औरंगाबादमधील सातारा गावातील खंडोबाला श्रद्धास्थान मानतात. जिल्ह्यातील सातारा (Aurangabad Satara) गावातील प्राचीन खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच रविवारी श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या नवरात्राला उत्साहात सुरुवात झाली. खंडोबाचा एरवी हा सहा रात्रींचा उत्सव असतो. मात्र यंदा दोन तिथी एकत्र आल्याने तो चार रात्रींचाच आहे. रविवारी पहाटे तीन वाजता मंदिरातल्या खंडोबाला अभिषेक, महापूजा करुन उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पहाटे राच वाजता महाआरतीनंतर यळकोट यळकोट जय मल्हार (Jai Malhar), मल्हारी मार्तंड चा जयघोष करत हळदीचा भंडारा उधळत उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. यात्रेत पहिल्याच दिवशी 12 हजार भाविकांनी दर्शन घेतले.
पुढील चार दिवस महाआरती, नियम पाळून दर्शनाला परवानगी
खंडोबाच्या नवरात्रानिमित्त पुढील चार दिवस दररोज खंडोबा मंदिरात महाआरती होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असे 12 तास कोरोनाचे नियम पाळत भाविकांना दर्शनासाठी प्रवेश असेल. 10 वर्षाखालील मुले व 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लस असेल तरच मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे.
9 डिसेंबर रोजी नवरात्रोत्सवाची सांगता
पुढील तीन दिवस सातारा येथील मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर संस्थानकडून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे. गाभाऱ्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक आहे. तसेच मंदिर परिसरात वाघ्या-मुरळींना परवानगी नसल्यामुळे भाविकांना मंदिराबाहेर जागर-गोंधळ घालावा लागत आहे. गुरुवारी चंपाषष्टीला या उत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी दिली.
खंडोबाचे आता युट्यूब चॅनेल
खंडोबा हे आराध्य दैवत असूनही कोरोनाच्या खबरदारीमुळे असंख्य भाविकांना मागील दोन वर्षांपासून खंडोबाच्या दर्शनाला मुकावे लागले आहे. त्यामुळे मंदिरातील पुजारी धुमाळ कुटुंबियांनी यावर्षी सातारा येथील खंडोबाच्या मंदिराचे युट्यूब चॅनल सुरु केले आहे. या चॅनलवर नवरात्रातील खंडोबाची महाआरती, खंडेरायाची फुलांची आरास घातलेली पूजा, भाविकांचा उत्साह आदी सर्व गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील, अशी माहिती पूजारी दिलीप प्रभाकर धुमाळ आणि आकाश धुमाळ यांनी दिली. युट्यूबची लिंक https://youtu.be/5mf137UjA34 ही आहे.
इतर बातम्या-