जालना महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल राजेश टोपेंविरोधात आक्रमक, काय आहेत आरोप?

जालन्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मनमानी कारभार चालवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

जालना महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल राजेश टोपेंविरोधात आक्रमक, काय आहेत आरोप?
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 3:00 AM

जालनाः जालन्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मनमानी कारभार चालवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी हा आरोप केला असून नुकतीच त्यांनी यासंदर्भात बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. जालना  पालिकेत एवढी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. मात्र राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल यांच्या वादामुळे आगामी निवडणुकांमध्ये युतीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जालना काँग्रेसचे आरोप काय?

जालना जिल्ह्यात पालकमंत्री राजेश टोपे मनमानी करत असल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालकमंत्री राजेश टोपे आमि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात नाराजीचा सूर असून महाविकास आघाडीचे सूत्र राजेश टोपे पाळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या किमान तीन जणांना संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु केवळ जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख या एकमेव काँग्रेस पदाधिकाऱ्याला संधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सदस्यांची जिल्ह्यातून जी यादी पाठवली होती, त्यात मुंबईत बदल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही समिती निवडताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या सहा जणांना संधी दिली आहे तर शिवसेनेकडून दोन जणांची निवड झाली आहे. त्यामुळे काँग्रेसवर येथे अन्याय झाला आहे, असे आरोप होत आहेत.

पालिका निवडणुकीत काय संकेत?

एकूणच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये जालन्यात बेबनाव पहायला मिळतोय. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीवर याचा परिणाम होईल, अशी चर्चा आहे. 2011 आणि 2016 या दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत शिवसेनेला बाहेर ठेवले होते. मात्र सध्याची स्थिती पाहता राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल वादाचे पडसाद युतीवर पडू शकतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युतीची शक्यता होईल, असे बोलले जात आहे.

इतर बातम्या-

Narayan Rane | संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब, हीच ब्रेकिंग न्यूज- नारायण राणे

Nagpur Water | जलजीवन मिशन योजना, आदिवासी पाड्यावर पोहचले पाणी! जिल्हा परिषदेनं काय केलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.