Latur | बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या 5 माऊली बुडाल्या, लातूरात हळहळ, मुलगा तेवढा वाचला!

महिला बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तलावावरील इतरांनी गावकऱ्यांना ही बातमी दिली. त्यानंतर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले. मात्र या घटनेत फक्त मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. अखेर पाचही महिलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.

Latur | बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या 5 माऊली बुडाल्या, लातूरात हळहळ, मुलगा तेवढा वाचला!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 3:42 PM

लातूरः लातूरमध्ये (Latur mishap) एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. साठवण तलावात एक मुलगा बुडू लागला. हे पाहून त्या मुलाला वाचवण्यासाठी तलावाशेजारी उभी असलेली एक महिला गेली. त्यानंतर तलावाच्या (Lake) किनाऱ्यारील इतरही महिलांनी त्यांची मदत करण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र मुलाला वाचवताना आपलेही प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न महिलांनी केले. मात्र पाण्याचा प्रवाह आणि तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या पाचही माऊली तलावात बुडाल्या (women drowned). इतर नागरिकांच्या मदतीने मुलाला वाचवण्यात यश आलं, मात्र या पाचही माऊलींना वाचवता आलं नाही. एकाच वेळी पाच महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुठे घडली घटना?

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील उजना गावच्या परिसरातील साठवण तलावात ही घटना घडली. सकाळी 10 वाजताची ही घटना आहे. विशेष म्हणजे या पाचही महिला ऊसतोड कामगार होत्या. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील त्या रहिवासी आहेत. कामानिमित्त त्या या भागात आल्या होत्या. मात्र बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात या पाचही महिलांचा करुण मृत्यू झाला.

मृत महिलांची नावं-

– राधाबाई आडे -(वय-45), – सुषमा राठोड-(वय-21), – काजल आडे-(वय-19), – दिक्षा आडे-(वय-22), – अरुणा राठोडा (वय-25)

हे सुद्धा वाचा

माऊली गेल्या, मुलगा वाचला

महिला बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तलावावरील इतरांनी गावकऱ्यांना ही बातमी दिली. त्यानंतर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले. मात्र या घटनेत फक्त मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. अखेर पाचही महिलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.