राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत, देसाई म्हणतात मनसे म्हणजे गळकं घर!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुढील आठवड्यात औरंगाबादमध्ये दौरा आयोजित केला आहे. तत्पूर्वीच शिवसेनेनं सूत्र हलवत विविध पादाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. आता मनसेसमोर मोर्चेबांधणीचे मोठे आव्हान आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत, देसाई म्हणतात मनसे म्हणजे गळकं घर!
मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 10:04 AM

औरंगाबादः येत्या 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला (Aurangabad MNS) गळती लागली. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत हा  सोहळा पार पडला.

कोणत्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश?

राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जि.प. सदस्य शैलेश क्षीरसागर, अविराज निकम, मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय म्हस्के, माजी नगरसेवक कांतीलाल निरपगारे, सामाजिक कार्यकर्त्या शकिला पठाण, बाळासाहेब औताडे, जुनेद अख्तर, मोहंमद साजिक आदींचा समावेश आहे.

मनसे गळकं घर, शिवसेनेचा वाडा चिरेबंदी- देसाई

मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनसे गळकं घर असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. इथे प्रवेश मिळतो, पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे.

मनसेच्या घरात कुडकुडत होतो- पदाधिकारी

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सुरात सूर मिसळत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मनसे नवीन घर आहे, म्हणून आम्ही त्यात प्रवेश केला होता. पण तिथे थंडीत कुडकुडण्याशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही, त्यामुळे आम्ही जुन्या घरात परत आलो.

औरंगबादेत मनसेला घरघर, मोर्चेबांधणीचे आव्हान

औरंगाबाद शहर आणि जिल्हा पातळीवर सध्या तरी मनसेचा तेवढा प्रभाव राहिलेला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पंरपारगत हिंदुत्ववादी मतदाराला खेचण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे यांचा औरंगाबादेत दौऱा आयोजित करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वीच शिवसेना आमदार यांनी सूत्रे हलवली विविध पदाधाकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. आता नव्याने मोर्चेबांधणीचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे.

इतर बातम्या-

Lady Police Suicide | 28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरी गळफास

Weight Loss : ‘या’ स्वादिष्ट आणि निरोगी भाज्या वजन कमी करण्यास मदत करतात, वाचा अधिक!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.