मराठवाड्यात अतिवृष्टी, तात्काळ पंचनामे करण्याच्या अजित पवारांच्या सूचना

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या - त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मराठवाड्यात अतिवृष्टी, तात्काळ पंचनामे करण्याच्या अजित पवारांच्या सूचना
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 4:59 PM

मुंबई : मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या – त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. (Loss of farmers due to heavy rains in Marathwada, Ajit Pawar’s orders to immediate panchnama)

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या – त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागद, सायगव्हाण या भागातील पिकांचीही यावेळी पाहणी केली.

जिल्ह्यात यंदा सरासरीइतकाच पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 5% जास्त, मराठवाड्यात 20% जास्त तर विदर्भात 14% कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस पडला. तर परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जून ते ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात 528.2 मिमी पावसाची नोंद झाली. जालन्यात 667.4 मिमी, बीडमध्ये 573.1मिमी, लातूरमध्ये 557.6 मिमी, उस्मानाबादमध्ये 494.7मिमी, नांदेडमध्ये 792.4 मिमी, परभणी 718.5मिमी , हिंगोलीत 711.1मिमी , तसेच एकूण औरंगाबाद विभागात 639.1 मिमी पावसाची नोंद झाली.

धनजंय मुंडेंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधांवर दाखल झाले. मुंडे यांनी आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ केला. पालकमंत्र्यांनी पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश दिले आहेत. तर, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन देखील धनजंय मुंडे यांनी दिलं आहे.

इतर बातम्या

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती गुरुवारी राष्ट्रपतींना भेटणार; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

एसटी कामगारांना पगार मिळणार?, अजितदादांनी एसटी महामंडळाला दिले 500 कोटी

(Loss of farmers due to heavy rains in Marathwada, Ajit Pawar’s orders to immediate panchnama)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.