Aurangabad | काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला थंड प्रतिसाद? तरीही स्वबळावर निवडणूका लढवणार, औरंगाबादेत काय स्थिती?

काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी जिल्ह्यातील सदस्य नोंदणीची स्थिती सांगितली. त्यानुसार, औरंगाबाद पूर्वमध्ये 298, पश्चिममध्ये 67, वैजापूरात 42, सिल्लोडमध्ये 10, गंगापूरमध्ये 442, फुलंब्रीत 680 , पैठणमध्ये 216, कन्नडमध्ये 231 अशी सदस्य नोंदणी झाली आहे.

Aurangabad | काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला थंड प्रतिसाद? तरीही स्वबळावर निवडणूका लढवणार, औरंगाबादेत काय स्थिती?
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:31 PM

औरंगाबादः काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणुकीसाठी सदस्यांची डिजिटल नोंदणी (Congress Membership) 1 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. 31 मार्चपर्यंत ही मोहीम चालणार आहे. मराठवाडा स्तरीय नोंदणीचे उद्घाटन नुकतेच मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील चार महिन्यांपासून काँग्रेस सदस्यांची डिजिटल पद्धतीने सुरु असून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सध्या राज्यातलं वातावरण बदलतंय. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढायच्या आहेत, असं म्हटलं. मात्र काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सदस्य नोंदणीची आकडेवारी जाहीर करून काँग्रेसच्या मिशनची पोलखोल केली.

जिल्ह्यातील सदस्य नोंदणीची स्थिती काय?

काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी जिल्ह्यातील सदस्य नोंदणीची स्थिती सांगितली. त्यानुसार, औरंगाबाद पूर्वमध्ये 298, पश्चिममध्ये 67, वैजापूरात 42, सिल्लोडमध्ये 10, गंगापूरमध्ये 442, फुलंब्रीत 680 , पैठणमध्ये 216, कन्नडमध्ये 231 अशी सदस्य नोंदणी झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एक कोटींची नोंदणी करण्याच्या सूचना आहेत. मात्र अद्याप एक लाखांचाही आकडा गाठता आलेला नाही. इंटरटेनच्या विस्कळीत सेवेमुळे ही अडचण येत असल्याचं मुत्तेमवार यांनी सांगितलं.

कागदावर नोंदणी करू देण्याची मागणी

काँग्रेसच्या सदस्य नोंदणीसाठी जिल्ह्यात अडथळे येत असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली. इंटरनेट अडचणींमुळे सदस्य संख्या कमी दिसत आहे, असे ते म्हणाले. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनीही कागदावर नोंदणी करु द्या, अशी मागणी केली.

इतर बातम्या-

औरंगाबाद | चंपा चौकात तलवारी नाचवणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, वाहनांची केली होती तोडफोड

महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत स्मृती इराणींनी केले विद्यार्थांचे स्वागत केले

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.