औरंगाबाद : औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाली आहे. गावातील 10 ते 12 गुंडांकडून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
गावगुडांनी शेतकरी कुटुंबाला केल्ल्या मारहाणीत शेतकरी काकासाहेब तुपे गंभीर जखमी झाले आहेत. काही महिलांना देखील मारहाण झाल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. काही व्यक्तींना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात करण्यात आली आहे.
मारहाण प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील शिरुर पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 7 ते 8 विविध कलमांन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
व्हिडीओ पाहा :
(maharashtra Aurabgabad Goons beaten up Farmer Family Fir File police)
हे ही वाचा :