Video | रस्ता बंद असल्यामुळे पाईपलाईनवरून जाण्याचा प्रयत्न अंगलट, थेट 10 फूट खोल नाल्यात कोसळला

नाल्याच्या पाईपलाईनवरून जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून यातील व्यक्ती 10 फूट खोल नाल्यात पडला.

Video | रस्ता बंद असल्यामुळे पाईपलाईनवरून जाण्याचा प्रयत्न अंगलट, थेट 10 फूट खोल नाल्यात कोसळला
AURNAGABAD MAN FALL
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 4:10 PM

औरंगाबाद : नाल्याच्या पाईपलाईनवरून जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या पाणचक्की परिसरात हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून यातील व्यक्ती 10 फूट खोल नाल्यात पडला. (man falls in nala trying to cross road with help of pipeline in Aurangabad)

पाईपलाईनवरुन जाणारा व्यक्ती नाल्यात 10 फूट खोल कोसळला

औरंगाबाद शहरातील धोकादायक मेहमूद दरवाजा सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नागरिक दरवाजाच्या बाजूला असलेल्या पाईपलाईनची मदत घेतात. पाईपलाईनच्या सहाय्याने लोक दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने जातात. मात्र, यावेळी दुर्घनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा पाईपलाईनवरून जाताना तोल गेला. परिणामी तो 10 फूट खोल असलेल्या नाल्यात जाऊन कोसळला.

खाली कोसळल्यानंतरची अवस्था कॅमेऱ्यात कैद 

हा प्रकार समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नाल्यात उतरुन लोकांनी खाली पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. माणूस खाली पडल्यानंतर त्याची झालेली अवस्था कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच दरवाजा बंद असल्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात घालून पाईपलाईनवरुन जाणे टाळावे असे आवाहन येथील प्रशासनाकडून केले जात आहे.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड

औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा

VIDEO : बीड जिल्ह्याचं नाव केलंss, लोकनेत्याच्या लेकीनंss, किशाबाईंच्या आवाजात पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

Know This | Surrogacy म्हणजे काय? भारतात सरोगसीला परवानगी आहे का? | Mimi Netflixhttps://t.co/V20Rf41AF7@vishakhanikam5 #Surrogacy #Mimi

— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021

(man falls in nala trying to cross road with help of pipeline in Aurangabad)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.