उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण, कुणाच्या जीवाला काही झालं तर… मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

| Updated on: Oct 28, 2023 | 1:36 PM

समाजाने जर निर्णय घेतला तर त्याविरोधात कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी जाऊ नये. समाजाच्या प्रश्नाला मानलं पाहिजे. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन मुंबईत चर्चा करावी. अधिवेशन बोलावून मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं. आमच्या खांद्याला खांदा लावून खासदार आणि आमदारांनी लढलं पाहिजे, असं कळकळीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण, कुणाच्या जीवाला काही झालं तर... मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi

 संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 23 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्यापासूनच राज्यातील गावागावातील मराठा समाज आमरण उपोषणाला बसणार आहे. या प्राणांतिक उपोषणा दरम्यान कुणाच्या जीवाला काही झालं तर त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच राहील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच देश आणि राज्यातील हे पहिलंच सामूहिक आमरण उपोषण असेल असा दावाही त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची माहिती दिली. उद्यापासून आमचं दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरू होणार आहे. उपोषण करताना प्रत्येकाने पाणी घ्यावं. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनीच उपोषण करा. संपूर्ण गावच्या गावं उपोषणाला बसा. उपोषणात सर्व गावं सहभागी झाल्यास सरकारवर दबाव होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतं का? हे दिसून येईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन प्रत्येक गावात

आपल्या गावात, दारात कोणत्याही नेत्यांना येऊ द्यायचं नाही. आपणही कोणत्याही नेत्याच्या दारात जायचं नाही. कुणाच्या जीवितास धोका झाला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहीलतिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 पासून तारखेपर्यंत सुरू होईल. त्याची माहिती 30 तारखेला देऊ. तिसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण प्रत्येक गावात सुरू होईल. सरकारचीच जबाबदारी राहील पुन्हा सांगतो. कारण हजारोच्या संख्यने लोकं आमरण उपोषणाला बसणार आहेत. देशातील आणि राज्यातील हे पहिलं सामूहिक आमरण उपोषण असेल. उपोषण शांततेत करा. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

उत्तरं द्या

दोन मुद्दे यावर संध्याकाळी सांगू. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 तारखेला पुन्हा सुरू होणार आहे. आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक राज्यकर्त्यांना उत्तर मागितलं आहे. ज्यांनी पालकत्व स्वीकारलं त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागेल. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट पाहू. सरकार दगाफटका करणार, की आमच्या नरड्यावर पाय देईल हे संध्याकाळी 6 वाजता समजून येईल, असंही ते म्हणाले.

पोटदुखीचा त्रास

उपोषणामुळे मला त्रास जाणवत नाही. पाणी पोटात नसल्याने थोडा त्रास होत आहे. पण माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजाच्या पोरांचा त्रास मोठा आहे. त्यांना जाणूनबुजून मोठं होऊ दिलं जात नाही. माझ्या त्रासाचा विचार करत नाही. समाजाच्या चेहऱ्यावर कसा आनंद निर्माण होईल हे पाहत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Oct 2023 12:52 PM (IST)

    Sharad Pawar | पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

    प्रत्येक राज्यांमध्ये सध्या वेगळा ट्रेंड दिसतोय. लोकसभा निवडणुकीत बदल होतील की नाही हे मी आत्ताच सांगू शकत नाही. राज्याराज्यांत इंडिया आघाडीमध्ये मतभिन्नता. वंचितसह पुढे जावं लागेल असं माझं वैयक्तिक मत. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण एकत्र लढू. इंडिया आघाडीत एकत्र बसून आम्ही चर्चा करू. पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

  • 28 Oct 2023 12:40 PM (IST)

    Sharad Pawar | अमेरिकेहून गहू आयात करण्याचा निर्णय मी पहिल्याच दिवशी घेतला होता

    आम्ही कृषी क्षेत्रात अनेक नव्या योजना सुरु केल्या. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या काळात शेतकऱ्यांसाठी शेततळे योजना. देशात साखर निर्यात करण्याची आवश्यकता. अमेरिकेहून गहू आयात करण्याचा निर्णय मी पहिल्याच दिवशी घेतला होता. आयात करणारा देश निर्यात करणारा झाला. मोदी सरकारने साखरेची निर्यातबंदी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून मोदींकडून साखर निर्यातबंदी. “शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी देशासाठी काय केलं?” मोदींच्या टीकेवर शरद पवारांचं उत्तर!

Published On - Oct 28,2023 12:07 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.