स्टेटसला ‘गुडबाय’ ठेवत तरुणाचा गळफास, औरंगाबादमधील भावसिंगपुऱ्यातील घटना

रात्री तीन वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात गुडबाय असे लिहिले. तसेच हा मेसेज नागेशने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

स्टेटसला 'गुडबाय' ठेवत तरुणाचा गळफास, औरंगाबादमधील भावसिंगपुऱ्यातील घटना
नागेशने आत्महत्येपूर्वी बदलले व्हॉट्सअपचे स्टेटस
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 5:54 PM

औरंगाबाद: व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहून एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली. मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आत्याला सांगितले, मी थकलोय…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागे मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे शिक्षण एम.ए. पर्यंत झालेले आहे. तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून लहानपणापासून तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भाहगात रहात होता. आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. नागेश घरात एकटाच होता. मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने त्याच्या आत्या औरंगाबादेत आल्या. त्यांनी नागेशला घेण्यासाठी ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने त्यांना सांगितले. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.

रात्री तीन वाजता बदलले स्टेटस

दरम्यान पोलिसांनी तरुणाच्या मोबाइलचा तपास केल्यानंतर, त्याने रात्री तीन वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात गुडबाय असे लिहिले. तसेच हा मेसेज त्याने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने त्याचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश जिरे करीत आहेत.

इतर बातम्या-

पुण्यात महिला लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, हिमाचलमधील ब्रिगेडियरवर गुन्हा

निल्या आणि गण्याने माझ्यावर बलात्कार केला, भगवद्गीतेत सुसाईड नोट ठेवत तरुणीची आत्महत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.