School Open: शासनाचा आदेश धुडकावत MESTA ने शाळा सुरु केल्या, काय म्हणतात संघटनेचे अध्यक्ष?

सरकारचा निर्णय झाला नाही तर आम्ही 17 जानेवारीपासून शाळा सुरु करू, कारवाईलाही सामोरे जाऊ असा इशारा मेस्टा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेअंतर्गत येणाऱ्या विविध शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील काही शाळा सुरु करण्यात आल्या.

School Open: शासनाचा आदेश धुडकावत MESTA ने शाळा सुरु केल्या, काय म्हणतात संघटनेचे अध्यक्ष?
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 3:55 PM

औरंगाबादः कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामीण भागात तर ऑनलाइनच्या सुविधांअभावी विद्यार्थी बरेच मागे पडले आहेत, असे स्पष्टीकरण देत MESTA  म्हणजेच महाराष्ट्र इंग्लिशन स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संघटनेने सरकारला शाळा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. सरकारचा निर्णय झाला नाही तर आम्ही 17 जानेवारीपासून शाळा सुरु करू, कारवाईलाही सामोरे जाऊ असा इशारा मेस्टा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेअंतर्गत येणाऱ्या विविध शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील काही शाळा सुरु करण्यात आल्या. औरंगाबादमधील ग्रामीण भागातील जवळपास 250 शाळा सुरु केल्याचा दावा मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केला आहे. औरंगाबादप्रमाणेच नागपूरमधील 30 ते 40 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विविध शहरांतील किती शाळा आज सुरु करण्यात आल्या, याची आकडेवारी लवकरच कळवण्यात येईल, असेही मेस्टाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले मेसाचे अध्यक्ष?

Sanjay Patil, MESTA

संजय तायडे पाटील, संस्थापक अध्यक्ष MESTA

MESTA संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे म्हणाले, ‘ घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा सुरु झालेल्या आहेत. बऱ्याच शाळा शहरी भागात आठवीनंतरच्या सुरु झाल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. आमच्या कामाची दखल म्हणून खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क साधला. राज्यातील शाळा टप्प्या-टप्प्यानं का होईना सुरु झाल्या पाहिजेत, असं त्यांनी सरकारला दूरध्वनीवरून कळवलेलं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंचे खूप खूप आभार. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांनीदेखील शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन, निर्णय घेऊ, असं कळवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व संस्थाचालकांचेही आभार.”

लसीकरण झाल्याने विद्यार्थी सुरक्षित- MESTA

सध्या तरी आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करत आहोत, अशी माहिती मेस्टा संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असून त्यांना कोरोनाचा फारसा धोका नाही, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांतील हे वर्ग भरवण्यास काहीच हरकत नाही, असेही मेस्टातर्फे सांगण्यात आले आहे.

27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा MESA

मेस्टा संघटनेनं आजपासून शाळा सुरु केल्याचं जाहीर केल्यानंतर मेसा संघटनेनेही याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. शासनाने लवकरात लवकर शाळांबाबत निर्णय घेतला नाही तर 27 जानेवारीपासून या संघटनेअंतर्गतच्या शाळाही सुरु करणार असल्याचं मेसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या-

एनडी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणाले, आमच्या बहिणीचे काही चालले नाही, तिथे आमच्या व्हिपचे काय?; काय आहे किस्सा?

Fact Check: अभिनेते किरण मानेंनी खरंच फडणवीस, मोदींसाठी शिवराळ भाषा वापरली? काय आहे ‘नालायक’ पोस्टचं वास्तव

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.