कोजागिरी पौर्णिमेनिमित्त औरंगाबादेत 2 कोटींचे दूध, 15 लाखांचा मसाला, हॉटेलमध्येही लहान-मोठे कार्यक्रम
औरंगाबाद: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त (Kojagiri Pournima) औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुधाचा मसाला उपलब्ध झाला आहे. आज 19 ऑक्टोबर रोजीच्या पौर्णिमेनिमित्त शहरात अंदाजे 2 कोटी रुपयांचे दूध आणि 15 लाख रुपयांचा दूध मसाला (Milk and Masala in Aurangabad Market) विक्री होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नागरिकांनी एकत्र जमून […]
औरंगाबाद: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त (Kojagiri Pournima) औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुधाचा मसाला उपलब्ध झाला आहे. आज 19 ऑक्टोबर रोजीच्या पौर्णिमेनिमित्त शहरात अंदाजे 2 कोटी रुपयांचे दूध आणि 15 लाख रुपयांचा दूध मसाला (Milk and Masala in Aurangabad Market) विक्री होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नागरिकांनी एकत्र जमून मैफल जमवलेली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे सावट काहीसे दूर झाले असल्याने शहरात ठिकठिकाणी लहान-मोठ्या मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लहान मोठ्या हॉटेल्सचे हॉलदेखील फुल्ल झाले आहेत.
दूध मसाला 3800 रुपये किलो
कोजागिरीचे दूध मसालेदार बनवण्यासाठी बाजारात रेडिमेड मसाला विक्रीला आला आहे. 10 ग्रॅम 45 रुपये तर 100 ग्रॅमची डबी 385 रुपयांना मिळत आहे. अर्थात हा मसाला फार कमी वापरावा लागतो. पण किलोचा विचार केल्यास होलसेलमध्ये हा मसाला 3,300 रुपये तर किरकोळ विक्रीत 3700-3800 रुपये किलो असा भाव आहे.
रोज 2 तर आज 4 लाख लीटरची विक्री
विविध कॉलनी, अपार्टमेंट आणि काही कुटुंबांमध्ये एकत्र अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात दूधाची ऑर्डरदेखील नोंदवली जात आहे. यासंदर्भात शासकीय दूध डेअरीचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, शहरात सर्व कंपन्यांचे पॅकिंगमधील दूध व डेअरीतील सुटे दूध मिळून दररोज अडीच लाख लीटर दुधाची विक्री होते. कोजागिरी पौर्णिमेला यात 2 लाख लीटरची आणखी वाढ होते. म्हणजेच आज 19 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत 4 लाख लीटर दुधाची विक्री होईल, असा अंदाज आहे. त्यानुसारच सकाळपासून दुधाच्या ऑर्डर येत आहेत. या एका दिवसाच 2 कोटी रुपयांची उलाढाल होईल. तसेच 300-350 किलो मसाला विक्री होईल. यातून 15 लाख रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाजची शासकीय दूध डेअरीचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोजागिरीचे महत्त्व
हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी अनेक विधी केले जातात. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य, पुथ्वी, आणि चंद्र एकाच रेषेमध्ये सरळ येतात. कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक विशेष महत्व आहे. या पौर्णिमेला कौमादी पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरीचा शाब्दिक अर्थ जागृत आहे आणि म्हणूनच या विशिष्ट दिवसाला जागृत पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा हा एक शुभ दिवस आहे जो हिंदू पंचागामध्ये हा दिवस अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो. हा दिवस लक्ष्मी देवीच्या पूजेचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. या वर्षी तो 19 ऑक्टोबर 2021, मंगळवारी साजरा केला जाईल.
इतर बातम्या-
Diya Remedies | पूजेच्या दिव्याने दूर होतील सर्व दु:ख, पूर्ण होतील सर्व इच्छा, हे उपाय करा