
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक परिणाम (Corona Effect on Student) हा शिक्षण क्षेत्रावर झालेला आहे. ऑनलाईनप्रणालीही परिणामकारक ठरली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की सर्व प्रथम शाळा, महाविद्यालये ही बंद केली जात होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हे महत्वाचे असले नव्याने शाळेत (Students in School) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना अद्यापपर्यंत अक्षर ओळखही झालेली नाही. प्राथमिक शिक्षणातील अध्ययनस्तरच घसरलेला आहे. आता हा घसरलेला स्तर उंचावण्यासाठी औरंगाबाद शिक्षण (Aurangabad education department) विभागाच्यावतीने ‘मिशन फर्स्ट’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच 30 एप्रिलपर्यंत इयत्ता पहिली ते तिसरी चे वर्ग सुरुच राहणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी 100 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याचे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षात अनेक वेळा कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. या दरम्यानच्या काळात ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला मात्र, तो प्रभावीपणे राबवणे शक्य झाले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे यापासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे वाचन, लेखन एवढेच नाही तर गणितासारख्या महत्वाच्या विषय़ावरही परिणाम झाला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशाच परस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला तर शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न कायम राहणार आहे.
‘मिशन फर्स्ट’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मुलाला किमान लिहता-वाचता आणि गणित येणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने शिक्षकांना उपक्रम राबवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि गणिते सोडवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे 30 एप्रिलपर्यंत म्हणजेच 100 दिवस वर्ग भरणार आहेत. आता जे गेल्या शैक्षणिक वर्षात जमले नाही ते आता 100 दिवसांमध्ये करुन घ्यावे लागणार आहे.
शिक्षण विभागाच्या या अनोख्या उपक्रमाची माहिती जिल्हाभरातील शिक्षकांना होण्याच्या दृष्टीने संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख हे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन शिक्षण परिषद घेतली गेली.. या माध्यमातून या मिशन फर्स्टची माहिती आणि प्रत्यक्ष वर्ग सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणते प्राथमिक शिक्षण द्यायचे याची माहिती दिली गेली. विद्यार्थी क्षमतेनुसार मराठी, गणित आणि उर्दू या विषयाची तयारी करुन घेतली जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ हे देखील 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
इतर बातम्या-