औरंगाबाद : माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजपा (BJP) किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचं नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलंय. औरंगाबाद(Aurangabad)मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
स्पष्ट उत्तरास टाळाटाळ
राज ठाकरेंचा अजेंडा काय? म्हणावं एवढं काम झालेलं नाही. आगामी काळात भाजपासोबत बोलणी सुरू आहे का?आदी विषयांवर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. सध्या आघाडीचे दिवस आहेत. त्यामुळे आपण कोणाशी युती करणार? काल काशीच्या निमित्तानं देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिंदुत्वा(Hindutva)चा सूर आळवला. त्यामुळे मतदार अशा बाबींकडे आकर्षित होतात का? असं विचारलं असता त्यांनी ठोसं असं काहीही सांगितलं नाही. आता कोणतेही पत्ते उघड करणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
‘स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगू?’
आगामी निवडणुकीसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, असा प्रश्न मला नाशिक(Nashik)मध्येही विचारला. स्ट्रॅटेजी ही हिडनच असते. त्यामुळे उघड असं नसतं. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचं काम झालंलं नाही. कामं काय आत्ताच सुरू झालीत असं नाही. ही प्रक्रिया सुरूच असते, असं ते म्हणाले. नाशिकमधला पाण्याची समस्या सोडवली. त्यामुळे तिथला 50 वर्षाचा पाणीप्रश्न सुटला, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, आजच जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या आज केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरवरही टीका केली. तर देशात मोदीलाट आहे किंवा मोदीकरिष्मा आहे, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.