शिक्षणासाठी मामाकडे राहण्याचा मुलीचा हट्ट, आई आणि मामामध्ये जुंपली, औरंगाबादमध्ये आईची मामाला मारहाण!
औरंगाबादमध्ये वाळूज परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणावरून भाऊ आणि बहिणींमध्ये वाद होऊन त्याचे भांडणात रुपांतर झाले. मुलीच्या आईने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने भावाला चांगलीच मारहाण केली. वाळूज पोलिसांनी यात हस्तक्षेप करत अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवले.
औरंगाबादः वाळूज परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या (Minor girl) शिक्षणावरून भाऊ आणि बहिणींमध्ये वाद होऊन त्याचे भांडणात रुपांतर झाले. मुलीच्या आईने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने भावाला चांगलीच मारहाण केली. आई शिकू देत नाही, अशी तक्रार घेऊन सदर मामी आणि अल्पवयीन भाची वाळूज पोलीस स्टेशनमध्ये (Police) तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, त्यावेळी आईने मैत्रिणीच्या मदतीने पोलीस स्टेशनसमोरच हा राडा केला. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
मुलीचा आजोळी शिक्षण घेण्याचा हट्ट
याविषयी अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी बजाजनगरमध्ये आई रामकौरसोबत राहून बजाजनगरमधील खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. कोरोनामुळे ती 10 महिन्यांपूर्वी मामा नकूस आणि आई कमलबाई टोणगे (बीड) यांच्याकडे राहण्यास गेली होती. दहावी असल्याने ती मामाच्याच घरी अभ्यास करीत होती. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ती मामा नकूससोबत बजाजनगरातील शाळेत आली होती. मात्र मुलगी आल्याचे कळताच आई रामकौर याने तिची भेट घेऊन आपल्याकडे राहाण्यास सांगितले. मात्र मुलीने आजोळी राहण्याचा हट्ट धरला. रामकौरने भावासोबत वाद घालत मुलीला घेऊन जाण्यास विरोध केला.
मामा-भाची पोलीस स्टेशनमध्ये
हा वाद वाढत गेल्यावर मामा आणि भाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. त्यावेळी रामकौरने आणखी दोन महिलांना सोबत घेऊन ठाण्यासमोर मुलगी आणि नकूसला गाठून मारहाण केली. सदर वादात पोलिसांनी हस्तक्षप केला. मुलगी अल्पवयीन असल्याने व तिचा सांभाळ करण्यावरून वाद सुरु झाल्याने पोलिसांनी तिला बालसुधारगृहात पाठवून दिले.
इतर बातम्या-