बिल नाही भरले… कनेक्शन तोडले!! मराठवाड्यातील 16 हजार 260 ग्राहकांवर महावितरणची कारवाई
थकबाकी न भरल्याने ज्या ग्राहकांची महावितरणणे वीज कापली आहे, त्यांना अंधारात रहायचे नसेल तर लवकराच लवकर बिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.
औरंगाबाद: ज्या ग्राहकांनी आतापर्यंत थकलेले वीज बिल (Electricity bill) भरले नाही. किंवा वारंवार सूचना करूनही त्यास पाठींबा दिला नाही, अशा वीज ग्राहकांवर महावितरणने (MSEDCL) कारवाई करायला सुरुवात केली आहे. महावितरणणे आता थकबाकी वसुली मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणे सुरु केले असून आजपर्यंत मराठवाड्यातील 16,260 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील एकूण थकबाकी किती?
मराठवाड्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणी पुरवठा अशा अकृषक वर्गवारीतील 19 हजार 552 वीज ग्राहकांकडे 3,870.25 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार सूचना, पत्रव्यवहार, जनजागृती करूनही थकबाकीदार बिलाच्या वसुलीकडे दुर्लक्ष करत आहते. अशा ग्राहकांवर कारवाई करण्यास महावितरणणे सुरुवात केली आहे. याअंतर्गत 16 हजार 260 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.
बिल भरणा झाल्यावरही जोडणी शुल्क घेणार
वीजबिल भरणा वसुली मोहीमेत ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणणे खंडित केला आहे. त्यांनी त्यांच्याकडून आधी पूर्णपणे बिल वसूल केले जाईल. तसेच या ग्राहकांकडून जोडणी शुल्क भरूनच वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
अंधारात रहायचे नसेल तर बिल भरा…
थकबाकी न भरल्याने ज्या ग्राहकांची महावितरणणे वीज कापली आहे, त्यांना अंधारात रहायचे नसेल तर लवकराच लवकर बिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी ग्राहकांनी जवळच्या महावितरण वीज बिल भरणा केंद्र अथवा ऑनलाइन माध्यमांच्या विविध सुविधांचा वापर करून सुटीच्या दिवशीही बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगशे गोंदावले यांनी केले आहे.
वीज परिमंडल व पुरवठा खंडित केलेले ग्राहक
परिमंडलातील औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील ग्राहकांवर महावितरणणे कारवाई केलेली आहे. यात औरंगाबादच्या 6657, लातूरच्या 4014 आणि नांदेडच्या 5589 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे मराठवाड्यातील एकूण 16,260 ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे.
इतर बातम्या –