वीजचोरांना महावितरणचा शॉक, सहा महिन्यात मराठवाड्यात 880 चोरांवर कारवाई, 5 कोटी दंड वसूल
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील संशयित वीजचोरांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

औरंगाबादः वीज महावितरण कंपनीने मागील सहा महिन्यांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये वीज चोरांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वीजचोरीतील संशयितांची झडती घेण्यात आली. यात संशयित 1 हजार 829 वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी करून 880 वीज चोर पकडण्यात आले आहेत. या चोरांना 08 कोटी 48 लाख 15 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला असून 04 कोटी 90 लाख 49 हजार रुपये दंड वसूलदेखील करण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सहा महिन्यांत 1,829 मीटरची तपासणी
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील संशयित वीजचोरांविरोधात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत 1,829 वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यावेळी आकडे टाकून वीज चोरी, मीटरमध्ये फेरफार करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे आदी प्रकारांद्वारे 880 जणांनी वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. या ग्राहकांना दंडाच्या अनुमानित रकमेच्या 08 कोटी 48 लाख रुपये बिलाची आकरणी करण्यात आली आहे. तसेच यापैकी 04 कोटी 90 लाख 49 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत 19 वीज ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उर्वीत ग्राहकांनी दंड न भरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले यांनी दिली.
वीजेच्या लपंडावामुळे उद्योजक त्रस्त
औरंगाबादमधील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, गंगापूर आणि लगतच्या अन्य भागांतील उद्योग क्षेत्रात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजक तर्स्त आहेत. यासंदर्भात उद्योग संघटना व उद्योजकांनी नुकतेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे आणि अधीक्षक अभियंता-शहरी प्रकाश जमदाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत नाराजी व्यक्त केली. या बैठकीत हेमंत कपाडिया व सीएमआयए एनर्जी सेल यांनी उद्योगांना वीजेशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
इतर बातम्या-
मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’, खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन