Nagar Panchayat Election: औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान, 3 जागी पोटनिवडणूक व 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार

औरंगाबादमध्ये सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. तसेच फुलंब्री आणि सिल्लोडमधील पोट निवडणुकांसाठीही मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानासाठी मतदान केंद्रे सकाळपासूनच मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Nagar Panchayat Election: औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान,  3 जागी पोटनिवडणूक व 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार
निवडणूक मतदान
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 7:10 AM

औरंगाबादः जिल्ह्यातील सोयगावमधील नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. तर फुलंब्री, सिल्लोड येथील नगरपंचायतींच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच फुलंब्री, सिल्लोड आणि येथील ग्रामपंचायतींसाठीही आज मतदान होत आहे. या निवडणुकांची मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.

सोयगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मतदान

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतदान होत असून 17 जागांपैकी 4 जागा ओबीसींच्या असल्याने येथे उर्वरीत 13 जागांवर मतदान घेतले जाणार आहे. सोयगाव येथील निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना 13 ,भाजप 13 ,कांग्रेस 6, राष्ट्रवादी 5 (आघाडी),व अपक्ष 3 असे एकूण चाळीस उमेदवार रिंगणात आहेत.

सिल्लोडमध्ये 1 जागेसाठी मतदान

सिल्लोड नगर परिषदेच्या एका जागेसाठी आज मंगळवार दिनांक 21 रोजी मतदान होत असून या प्रभागात 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरताना दहा उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केले होते, त्यापैकी छाननीमध्ये चार अर्ज बाद झाल्यानंतर सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

फुलंब्रीः 2 जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात

नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 2 व 8 मध्ये पोट निवडणूक होणार असून भाजपा, महाविकास आघाडी, तर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून या दोन जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात आहे. नगरपंचायतची ही पोटनिवडणूक निवडून येणारे नगरसेवकांना फक्त एकवर्षाचा कालावधी मिळणार आहे. या रिक्त जागेवर होत असलेल्या पोटनिवणूक मध्ये अगोदर दोन्ही नगरसेवक भाजपचे होते. परंतु अतिक्रमण केल्याचा आरोप या दोन नगरसेवकांवर करण्यात आला होता. हे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप व वंचित बहूजन आघाडीने येथे स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.

फुलंब्रीतील 7 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक

तालुक्यात 7 ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक होत असून यामध्ये निमखेडा, रिधोरा देवी, पेंडगाव, ग्रुपग्रामपंचात आळंद नायगव्हाण, खामगाव, पाथ्री, आडगाव बु., या गावाचा समामेवश आहे. या गावात होणाऱ्या 7 जागेच्या पोटनिवडणूक साठी 17 उमेदवार नशीब आजमावत आहे. यामध्ये पाथ्री, खामगाव, आडगाव खु., येथे एका जागेसाठी तीन-तीन उमेदवार उभे असून इतर गावात एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

इतर बातम्या-

मुंबईकरांच्या नशिबी खराबच रस्ते; उणे दराच्या निविदा कंत्राटदाराच्या फायद्यासाठी, भाजपचा गंभीर आरोप

St worker Strike : 54 मृत्यूवर सरकार डान्स करतंय, विलीनीकरणाचा प्रस्ताव घेऊन या: अॅड. गुणरत्न सदावर्ते

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.