Terrorist | बब्बर खालसाच्या अतिरेक्यांना नांदेडमध्ये आणणार? हरियाणात पकडलेल्या अतिरेक्यांचा ताबा Nanded पोलिसांनी मागितला!

बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेशी निगडीत या अतिरेक्यांचे नेमके मनसुबे काय होते? हरियाणातून दिल्लीमार्गे नांदेडमध्ये शस्त्रसाठा कशासाठी नेला जात होता? यापूर्वी अशा प्रकारे किती वेळा किती साठा इतर राज्यांमध्ये नेला आहे? पंजाबमधील या दहशतवादी संघटनेचं जाळं आणखी किती राज्यात फोफावलं आहे? आदी प्रश्नांची उकल करणं हे देशातील गुप्तचर यंत्रणेसमोरील मोठं आव्हान आहे.

Terrorist | बब्बर खालसाच्या अतिरेक्यांना नांदेडमध्ये आणणार? हरियाणात पकडलेल्या अतिरेक्यांचा ताबा Nanded पोलिसांनी मागितला!
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 4:45 PM

नांदेडः हरियाणात करनाल पोलिसांनी (Karnal police) पकडलेल्या बब्बर खालसा (Babbar Khalsa) या दहशतवादी (Terrorist) संघटनेच्या चार अतिरेक्यांचा ताबा नांदेड पोलिसांनी मागितला आहे. न्यायालयाच्या मदतीने नांदेड पोलीस हा ताबा मागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असतून चौघांविरोधात अटक वॉरंट मिळाल्यानंतर नांदेड पोलीस हरियाणात आरोपींचा ताबा घेण्यासाठी जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या चार अतिरेक्यांचा ताबा मागणाने नांदेड पोलीस प्रथम ठरले आहे. मात्र एटीएस आणि देशातील काही गुप्तचर यंत्रणादेखील या अतिरेक्यांचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा आणण्याच्या तयारीत होते. त्यामुळे नांदेड पोलीस अलर्ट झाले आहेत. शहरात किंवा महाराष्ट्रात काही घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता का असा संशय पोलिसांना असून त्यासाठीच चौकशीकरिता अतिरेक्यांचा ताबा मिळवण्याचा नांदेड पोलिसांचा प्रयत्न आहे.

‘देशातील यंत्रणांचे लक्ष चार दहशतवाद्यांकडे’

करनाल पोलिसांनी पकडलेल्या चार दहशतवाद्यांकडे अवघ्या देशातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचे लक्ष लागले आहे. बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेशी निगडीत या अतिरेक्यांचे नेमके मनसुबे काय होते? हरियाणातून दिल्लीमार्गे नांदेडमध्ये शस्त्रसाठा कशासाठी नेला जात होता? यापूर्वी अशा प्रकारे किती वेळा किती साठा इतर राज्यांमध्ये नेला आहे? पंजाबमधील या दहशतवादी संघटनेचं जाळं आणखी किती राज्यात फोफावलं आहे? आदी प्रश्नांची उकल करणं हे देशातील गुप्तचर यंत्रणेसमोरील मोठं आव्हान आहे. या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हरियाणात पकडलेल्या चार दहशतवाद्यांकडे देशातील यंत्रणांचे लक्ष लागले आहे. नांदेड पोलिसांप्रमााणेच एटीएस आणि इतर यंत्रणादेखील या अतिरेक्यांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बाबरखालसाचे चार अतिरेकी कोण?

नांदेड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दहशत असलेला बब्बर खालसा या संघटनेचा सदस्य हरविंदरसिंग रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला आहे. पाकिस्तानातून तो ड्रोनच्या मदतीने शस्त्रे पाठवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने पाठवलेली स्फोटके घेऊन जाणारे अतिरेकी गुरुप्रित, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर हे नांदेडकडे वाहनातून येत असताना कर्नाल पोलिसांनी त्यांना पकडले. रोबोटद्वारे त्यांच्या गाडीची झडती घेऊन शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यानंतर चौकशीअंती त्यांचं नांदेड कनेक्शन उघड झालं. विशेष म्हणजे हे आरोपी मार्च महिन्यात नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी असल्याची माहिती पुढे आली आहे. 30 मार्च ते 02 एप्रिलपर्यंत हे चारही अतिरेकी नांदेडमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर ते बिदरमार्गे पुढे गोव्याला गेले असल्याचेही वृत्त आहे. मात्र नांदेडमध्ये ते कोणा-कोणाला भेटले, याचा तपास पोलीस करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.