अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरावर दगडफेक, औरंगाबादमध्ये तुफान राडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांचं औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राहत्या घराच्या बाहेर दाखल झाले. तिते त्यांनी सत्तारांच्या घरावर दगडफेक केली.

अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरावर दगडफेक, औरंगाबादमध्ये तुफान राडा
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 5:58 PM

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांचं औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राहत्या घराच्या बाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी सत्तारांच्या घरावर दगडफेक केली.

अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक तरुण कार्यकर्ते सत्तारांच्या सिल्लोड येथील राहत्या घराबाहेर दाखल झाले.

कार्यकर्त्यांनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्या बंगल्याच्या गेटवर चप्पल फेकल्या. काठ्या हाणल्या. तसेच सत्तारांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की पोलिसांना देखील आवरणं कठीण होऊन बसलं होतं.

हे सुद्धा वाचा

“अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अपमान केलाय. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. सत्तार जोपर्यंत सुप्रिया सुळे यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावरच काय, तर त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करु. सत्तार यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या सगळ्या गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर सुप्रिया यांनी सत्तारांच्या टीकेवर बोलणंच टाळलेलं नाही. “मला अब्दुल सत्तार यांच्यावर काहीच बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.