Omicron Alert: राज्यात रात्रीच्या वेळी जमावबंदी लागू , औरंगाबादमध्ये कोणते निर्बंध?
राज्यात वाढता ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी 24 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोणते निर्बंध असतील यासंदर्भातील निर्णय 27 डिसेंबर रोजी घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबादः ओमिक्रॉनग्रस्तांचा राज्यातील आकडा वाढताना दिसत आहे. त्यातच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अनेकजण विशेष कार्यक्रम, पार्ट्यांच्या आयोजनाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 24 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी नवी नियमावली 27 डिसेंबर रोजी जारी केली जाईल, असे सांगितले. सध्या 30 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गर्दी नियंत्रणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी सुरु आहे.
शहरात सध्या कोणते नियम लागू?
– ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृहात बंदिस्त जागेवर घेणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के लोकांना परवानगी आहे. – लग्न समारंभातील उपस्थितीवर 100 व्यक्तींपर्यंत निर्बंध आहेत. तर रात्री 9 नंतर संचारबंदी असल्यामुळे हॉटेलवर बंधने आली आहेत. – शाळांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात होईल. सध्या शहरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा सुरु आहेत.
शाळेतील195 विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह दरम्यान शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणच्या शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 345 विद्यार्थ्यांची मनपा पथकाने कोरोना चाचणी केली होती. त्यातील 195 विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत 120 विद्यार्थ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती शाळेने दिली आहे.
इतर बातम्या-