मराठावाड्यातले सेतु सुविधा केंद्र हँग, औरंगाबाद विभागात महा-ऑनलाइनचे सर्व्हर डाऊन, शुक्रवारपासून कामे ठप्प
महा ई सेवा ऑनलाइन प्रणालीच्या यंत्रणेवर मंत्रालयातूनच नियंत्रण केले जाते. प्रत्येक विभागाचे सर्व्हर येथेच असून गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे हे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती स्थानिक पातळीवरून देण्यात आली आहे.
औरंगाबादः राज्य शासनाच्या महा ई सेवेच्या (Maha E Seva) ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका मराठवाड्यातील सेतू सुविधांसह महा ईसेवा केंद्राला बसला आहे. केवळ मराठवाडा विभागाचेच सर्व्हर डाऊन असल्याने जात, रहिवासी, उत्पन्नासह इतर सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून एकाही प्रमाणपत्रासाठी अर्ज घेण्यात आलेले नाही. तसेच अर्जांचे वितरणही होऊ शकले नाही, अशी माहिती सेतू सुविधा केंद्राच्या वतीने देण्यात आलीआहे.
औरंगाबाद विभागाचे सर्व्हर डाऊन
महा ई सेवा ऑनलाइन प्रणालीच्या यंत्रणेवर मंत्रालयातूनच नियंत्रण केले जाते. प्रत्येक विभागाचे सर्व्हर येथेच असून गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे हे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती स्थानिक पातळीवरून देण्यात आली आहे. याबाबत सेतू सुविधा केंद्रातील व्यवस्थापकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सध्या संपूर्ण औरंगाबाद विभागाचे महा ऑनलाइन सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व अर्जाचे स्कॅनिंग होत नाही. त्यामुळे काम बंद आहे.
विद्यार्थ्यांच्या कामात अडथळे
सध्या विद्यार्थ्यांना उत्पन्न, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची प्रवेशासाठी गरज भासत आहे. सेतू सुविधा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दररोज 250 प्रमाणपत्रे वितरीत
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून जात, रहिवासी, नॉन क्रिमेलियर, उत्पन्न, ईडब्ल्यूए, नॅशनॅलिटी अशी विविध प्रमाणपत्रे वितरीत केली जातात. दररोज किमान 250 ते 300 प्रमाणपत्रे वितरीत होत असतात.
इतर बातम्या-