शिवचरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम अखंड जिवंत राहील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर श्रद्धांजली

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी पंकजा मुंडे यांनी जाग्या केल्या. त्या म्हणाल्या, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुरंदरे यांनी नेहमीच केलं. त्यामुळे त्यांचं हे काम अखंड जिवंत राहील.'

शिवचरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम अखंड जिवंत राहील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर श्रद्धांजली
बाबासाहेब पुरंदरे यांना भाजपा नेत्या पंकजा मुंडेंकडून आदरांजली
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 2:25 PM

बीड (परळी): भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना आदरांजली वाहिली आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital, Pune) रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर देशभरातील नेते, इतिहास प्रेमी आणि कलाकार व अभ्यासकांनी बाबासाहेबांच्या निधनाबद्दल विविध माध्यमांवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. परळी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही बाबासाहेबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

शिवचरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम अखंड जिवंत राहील

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी पंकजा मुंडे यांनी जाग्या केल्या. त्या म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुरंदरे यांनी नेहमीच केलं. त्यामुळे त्यांचं हे काम अखंड जिवंत राहील.’ बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

अंबाजोगाई बलात्कारितेच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी

दरम्यान, अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेवरही पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होतेय, त्यामुळे गृहमंत्रालयाने याची दखल घेत, असे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणीदेखील पंकडजा मुंडे यांनी यावेळी केली.

अंबाजोगाई येथील मजूर कुटुंबातील मुलीच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर पीडितेच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पीडित मुलगी लग्नानंतर सासरच्या छळाला कंटाळून माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर शहरात नोकरी शोधण्यासाठी गेल्यानंतर अंबाजोगाई येथील एका अकादमीत तिची दोन लोकांशी भेट झाली. नोकरी लावण्याच्या नावाखाली दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्यावर 400 हून अधिक वेळा बलात्कार झाला. पीडित मुलगी सध्या 20 आठवड्यांची गरोदर आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

कोरोनाचा पॅरोल पथ्यावर? राज्यातल्या 20 हजार कैद्यांची कायमची सुटका? काय आहे, सर्वोच्च न्यायालयातला खटला?

धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.