माझे विचार गुप्त, अंडरग्राऊंड; पंकजा मुंडे यांच्या मनात काय चाललंय?
बीडमध्ये 6 जागा आमच्या होत्या. आता सध्या 3 जागा आमच्याकडे आहेत. दूध पोळले आहे, आता ताक फुंकून प्यावे लागेल. असं मी म्हणाले. मी कार्यकर्ती आहे, स्वतःचं तिकीट मिळालं तर लढणं आणि प्रचार करणं हे माझं व्हिजन आहे. राज्याचे व्हिजन हे माझं दायित्व नाही.
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना तेलंगणातील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. आमच्या पक्षात या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, अशी ऑफरच चंद्रशेखर राव यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्यांनी पंकजा मुंडे या बीआरएसची ऑफर स्वीकारणार नाही, त्या अखेरपर्यंत भाजपमध्येच राहतील, असा दावा केला आहे. मात्र, या सर्व घडामोडी घडत असताना पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पंकजा मुंडे पक्ष सोडणार की काय अशी चर्चाही रंगलेली होती. ही चर्चा रंगलेली असतानाच पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मीडियाशी संवाद साधताना बीआरएसच्या ऑफरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बीआरएसची ऑफर मी माध्यमातून पाहिली. माझे विचार गुप्त आणि अंडरग्राउंड असतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी बीआरएसची ऑफर थेट नाकारली नाही. त्याऐवजी त्यांनी सूचक विधान केलं. त्यामुळे पंकजा यांच्या मनात काय चाललंय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे आगामी काळातील पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक कृतीला राजकीय अर्थ असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
जोपर्यंत मराठ्यांना…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केलं. हे भाष्य करताना त्यांनी भाजपचेच नेते राधाकृष्ण विखेपाटील यांना प्रत्युत्तरही दिलं आहे. 2020 मध्ये मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत हार आणि फेटा घालणार नसल्याचं जाहीर केलं होतं. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलं म्हणून हार घालण्यास सुरुवात केली. मात्र काल मला बीडमध्ये फेटा घाला म्हणून आग्रह होता. पण मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नसल्याचं मी जाहीर केला आहे. माझा तो पण आहे. त्यामुळे मी फेटा घातला नाही, असं त्यांनी सांगितलं. लोक म्हणतात मला फेटा शोभतो. मुंडे साहेबांना जसा शोभतो तसा तुम्हाला शोभतो. मी म्हणाले, ज्या दिवशी बांधेल. त्या दिवशी बांधेल, असंही त्या म्हणाल्या.
आवाहन भावनिक नव्हतं
परळीत तीन महिने मराठा आरक्षणा संदर्भात ठिया आंदोलन झालं. या आंदोलनात मी ही सहभागी झाले होते. कोणीही नेता तिकडे फिरकला नाही. मी तिथं जाऊन भाषण केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे ही माझी भूमिका होती. माझी भूमिका मी कधीही बदलणार नाही. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार हे जो नेता बोलेल ते समाजाचा खरा कैवारी असेल, असं सांगतानाच माझं कालच वक्तव्य भावनिक नव्हतं, असं त्या म्हणाल्या.
म्हणून निघून गेले
मी कोणतेही शब्द मागे घेत नाही. मला एवढ्या वर्षाची भाषणाची सवय आहे. मला निसर्गत: सूचतं ते मी बोलते. मी एकच भाषण अनेक वेळा करत नाही. प्रत्येक ठिकाणी मी वेगळं भाषण करते. काल विनायक मेटे यांना आदरांजली वाहिली. मात्र फडणवीस उशिरा आल्याने मी हजर राहू शकले नाही. पक्षाने विविध कार्यक्रम प्रत्येकाना सोपविले होते म्हणून मी पुढील कार्यक्रमाला गेले, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बुलढाणा: अपघात दुर्दैवी आहे. रस्ता चांगला आहे म्हणून लोकांनी वाहने वेगात चालवू नये.समृद्धी महामार्गावर मेडिकल ची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. लोकांची जबाबदारी महत्वाची आहे. सरकारने व्यवस्था सुदृढ कराव्या