दहावीच्या मुलींमागे ग्रीटिंग घेऊन फिरु लागले 40 वर्षांचे काका… राडा झालाच ना मग… काय घडलं औरंगाबादेत?

मुलींनी सांगितल्याप्रमाणे संशयित हा हातात ग्रीटिंग कार्ड घेऊन तीन मुलींच्या मागे चालू लागला. तो काहीसा जवळ येणार, हे लक्षात येताच मुलींनी आरडाओरड सुरु केली. एवढ्यात पालक तेथे आले..

दहावीच्या मुलींमागे ग्रीटिंग घेऊन फिरु लागले 40 वर्षांचे काका... राडा झालाच ना मग... काय घडलं औरंगाबादेत?
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:14 AM

औरंगाबाद | ट्यूशनला जाणाऱ्या दहवीच्या मुलींची (10th Student)छेड काढणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई झाल्याचं आपण ऐकलेलं असतं. अशा मुलांचा कसा बंदोबस्त करायचा, त्यांना कसं वठणीवर आणायचं, यासाठी शहर पोलीसही (Aurangabad police) वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. पण औरंगाबादमध्ये आणखी विचित्र प्रकार घडला. ट्यूशनसाठी जाणाऱ्या दहावीच्या तीन मुलींमागे ग्रीटिंग घेऊन फिरणारा एखदा तरुण मुलगा नव्हता तर तब्बल 40 वर्षांचा इसम होता. मुलींनी पाहिलं पाहिलं आणि या प्रकाराची तक्रार पालकांकडे केली. अखेर पालक (Parents) आणि रस्त्यावरील लोकांनी मिळून या इसमाला रंगेहाथ पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला.

काय घडला प्रकार?

शहरातील उल्का नगरीतील इलेक्ट्रीक दुकानात काम करण्यासाठी सदर सुभाष कुलकर्णी नावाचा हा इसम नाशिकहून औरंगाबादला आला आहे. मागील तीन वर्षांपासून तो डॉ. हेडगेवार रुग्णालयासमोरील हॉस्टेलमध्ये कॉट बेसिसवर राहतो. त्याला दोन हजार रुपये किराया आहे. दरम्यान, मागीत तीन ते चार दिवसांपासून कुलकर्णी हा जयभवानी हायस्कूल समोर उभा राहून नववी व दहावीच्या मुलींमागे फिरताना आढळला होता. सुरुवातीला हा प्रकार मुलींच्या लक्षात आला नाही. नंतर हा इसम वारंवार पाठलाग करू लागल्यावर मुलींना ते खटकलं. त्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे शुक्रवारी मुलींचे पालकदेखील या भागात आले. मुलींनी सांगितल्याप्रमाणे संशयित हा हातात ग्रीटिंग कार्ड घेऊन तीन मुलींच्या मागे चालू लागला. तो काहीसा जवळ येणार, हे लक्षात येताच मुलींनी आरडाओरड सुरु केली. लगेच पालक आणि नागरिकांनी सुभाष कुलकर्णीला चोप दिला. त्यानंतर जमावानं त्याला जवाहरनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिली तंबी!

दरम्यान, सदर प्रकरणात इसमाचे वय पाहता, पालकांपैकी कुणीही त्याविरोधात तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याता याविषयी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. सायंकाळपर्यंत सुभाष कुलकर्णीला ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. संध्याकाळी कलम 110 आणि 117 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन कुलकर्णीला सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

इतर बातम्या-

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

धरण तेलंगणाचं, नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, 25 गावच्या शिवारातील शेतजमिनी गायब… काय आहे प्रकरण?

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.