औरंगाबाद | ट्यूशनला जाणाऱ्या दहवीच्या मुलींची (10th Student)छेड काढणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई झाल्याचं आपण ऐकलेलं असतं. अशा मुलांचा कसा बंदोबस्त करायचा, त्यांना कसं वठणीवर आणायचं, यासाठी शहर पोलीसही (Aurangabad police) वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. पण औरंगाबादमध्ये आणखी विचित्र प्रकार घडला. ट्यूशनसाठी जाणाऱ्या दहावीच्या तीन मुलींमागे ग्रीटिंग घेऊन फिरणारा एखदा तरुण मुलगा नव्हता तर तब्बल 40 वर्षांचा इसम होता. मुलींनी पाहिलं पाहिलं आणि या प्रकाराची तक्रार पालकांकडे केली. अखेर पालक (Parents) आणि रस्त्यावरील लोकांनी मिळून या इसमाला रंगेहाथ पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला.
शहरातील उल्का नगरीतील इलेक्ट्रीक दुकानात काम करण्यासाठी सदर सुभाष कुलकर्णी नावाचा हा इसम नाशिकहून औरंगाबादला आला आहे. मागील तीन वर्षांपासून तो डॉ. हेडगेवार रुग्णालयासमोरील हॉस्टेलमध्ये कॉट बेसिसवर राहतो. त्याला दोन हजार रुपये किराया आहे. दरम्यान, मागीत तीन ते चार दिवसांपासून कुलकर्णी हा जयभवानी हायस्कूल समोर उभा राहून नववी व दहावीच्या मुलींमागे फिरताना आढळला होता. सुरुवातीला हा प्रकार मुलींच्या लक्षात आला नाही. नंतर हा इसम वारंवार पाठलाग करू लागल्यावर मुलींना ते खटकलं. त्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे शुक्रवारी मुलींचे पालकदेखील या भागात आले. मुलींनी सांगितल्याप्रमाणे संशयित हा हातात ग्रीटिंग कार्ड घेऊन तीन मुलींच्या मागे चालू लागला. तो काहीसा जवळ येणार, हे लक्षात येताच मुलींनी आरडाओरड सुरु केली. लगेच पालक आणि नागरिकांनी सुभाष कुलकर्णीला चोप दिला. त्यानंतर जमावानं त्याला जवाहरनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सदर प्रकरणात इसमाचे वय पाहता, पालकांपैकी कुणीही त्याविरोधात तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याता याविषयी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. सायंकाळपर्यंत सुभाष कुलकर्णीला ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. संध्याकाळी कलम 110 आणि 117 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन कुलकर्णीला सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
इतर बातम्या-