Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Karuna Sharma)

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?
karuna sharma
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 12:32 PM

बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (pistol putting in Karuna Munde’s car, devendra Fadnavis demand enquiry)

करुणा शर्मा या परळीत आल्या होत्या. शहरात प्रवेश करताच काही लोकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. मोठा जमाव शर्मा यांच्या गाडीभोवती जमा झाला. त्यामुळे त्यांची गाडी भर बाजारात थांबली होती. त्यानंतर शर्मा या पुढे निघून गेल्या.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

निलेश राणेंचं ट्विट काय?

करुणा शर्मांची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते, असा सावल

फडणवीस काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. (pistol putting in Karuna Munde’s car, devendra Fadnavis demand enquiry)

संबंधित बातम्या:

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी 5 वर्षांचा कारावास, महाराष्ट्रातील कोर्टाचा सुपरफास्ट निकाल

चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ

(pistol putting in Karuna Munde’s car, devendra Fadnavis demand enquiry)

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.