Aurangabad: एकाच रस्त्याचं चौथ्यांदा भूमीपूजन, आघाडी मुंबईत, कुरघोडी गल्लीत, काय आहे रस्त्याचं राजकारण?
औरंगाबादः गेल्या सहा वर्षात शहरातील एकचा रस्त्याचे तब्बल चार वेळा भूमीपूजन झाले. एकाच रस्त्याच्या कामाचा ढोल पिटण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (BJP) व्यासपीठाचा वापर केला. मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्याच रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पण रस्ता बांधण्याचे काम होणार की नाही, असा सवाल अद्याप कायम आहे. त्यामुळे […]
औरंगाबादः गेल्या सहा वर्षात शहरातील एकचा रस्त्याचे तब्बल चार वेळा भूमीपूजन झाले. एकाच रस्त्याच्या कामाचा ढोल पिटण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (BJP) व्यासपीठाचा वापर केला. मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्याच रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पण रस्ता बांधण्याचे काम होणार की नाही, असा सवाल अद्याप कायम आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर फक्त राजकारणासाठी (Politics) सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सहा वर्षात चार वेळा भूमीपूजन
शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर-विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे चार वेळा भूमीपूजन झाले. 10 जानेवारी 2021 रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. त्यासाठी शासनाकडून 49 लाख रुपयांचा विशेष निधी आणाल. माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी तो मंजूर करुन घेतला. पण कंत्राटदाराने काम वेळेत सुरु न केल्याने त्याला ब्लॅक लिस्ट कऱण्यात आले. नंतर माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आमदार शिरसाट यांच्यामार्फत निधी मिळवला. पुन्हा एकदा भव्य समारंभात रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.
यंदाच्या भूमीपूजनात भाजप, राष्ट्रवादीला चिमटे
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी रस्त्याच्या भूमीपूजनाची ही चौथी वेळ असल्याचे सांगितले. येथील पूर्व मतदारसंघाचे आमदार दुसरे आहेत, पण येथील जनेसाठी आम्ही निधी आणल्याचे वक्तव्य त्यांनी केले. भाजप आमदार अतुल सावे यांच्या मतदारसंघात रस्त्याचा निधी आणला तसेच मनपा निवडणुकीत राषअट्रावादीची गरज पडणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले. आमदार बागडे यांच्या घराजवळच्या रस्त्याचे काम सुरु केल्याचे सांगून त्यांनाही डिवचले.
भाजप आमदाराच्या मतदारसंघात रस्ता
भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मतदार संघातला हा रस्ता असून ते म्हणाले आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिवाकर रावते, खैरे, टोपे यांनीच भूमीपूजन केले. कामासाठी मनपाने एनओसीही दिली. त्यामुळे मला त्या रस्त्याचे काम करता आले नाही. मनपाने एनओसी दिल्यानंतर दुसरा निधी तेथे वापरता येत नसतो.
इतर बातम्या-