Aurangabad: मनपा निवडणूक, औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पूर्ण, ख्रिसमसच्या सुटीनंतर निकालाची शक्यता

औरंगाबाद महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यानंतर जुन्या वॉर्ड रचनेविरोधातील सर्वोच्च न्यायलयातील याचिका निरस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर ख्रिसमसच्या सुटीनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे.

Aurangabad: मनपा निवडणूक, औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पूर्ण, ख्रिसमसच्या सुटीनंतर निकालाची शक्यता
औरंगाबाद महापालिका
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 3:58 PM

औरंगाबादः औरंगाबाद महानगर पालिका प्रशासनाने 2019 मध्ये चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना आणि आरक्षणे टाकल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे. शुक्रवारी या प्रलंबित याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रामण्णा, न्या. सूर्यकांत व न्या. हीमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून आगामी ख्रिसमसच्या सुटीनंतर याचिकेवरील निकाल अपेक्षित आहे.

काय आहे याचिका?

2019 मध्ये महानगर पालिका निवडणुकीअंतर्गत रजाकीय प्रभावाखाली वॉर्ड रचना आणि आरक्षण सोडत काढल्याचा आरोप याचिकाकर्ते समीर राजूरकर, किशोर तुलसीबागवाले, अनिल विधाते व लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्यातर्फे करण्यात आली होती. मात्र आता राज्य निवडणूक आयोगच्यावतीने पूर्वीची एक सदस्यीय रचनाच रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करण्यात येतआहे. त्यामुळे ही याचिका निरस्त झाली असून ती फेटाळण्यात यावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली.

पुढील प्रभागरचनेसाठी आदेश देण्याची विनंती

दरम्यान, आता बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येणार असली तरीही न्यायालयाने सदरची याचिका निरस्त म्हणून निकाली काढू नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याऐवजी, नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभाग रचना व आरक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान कायदेशीर तरतुदींचे तसेच नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास देण्यात यावेत, अशी विनंतीही करण्यात आली. सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी ख्रिसमसच्या सुटीपर्यंत तहकूब केली. आता जानेवारीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अॅड. अजित कडेठाणकर, तर समीर राजूरकर यांच्यावतीने अॅड देवदत्त पालोदकर व अॅड शशिभूषण आडगावकर हे काम पाहत आहेत.

इतर बातम्या-

काय म्हणता….लग्नानंतर लगेच विकी कौशलला सोडून सलमानकडे परतणार कतरिना कैफ!

Murder | वाद छोटा, कांड मोठा! दारुसाठी 20 रुपये दिले नाहीत म्हणून चक्क जीवच घेतला

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.