Aurangabad: शेकटा येथे पाण्याच्या टाकीवर प्रहार संघटनेचे आंदोलन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
रंगाबादमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट २० हजारांची आर्थिक मदत करा, शेकटा मध्यवर्ती बँक सोसायटी नवीन सभासदांना कर्ज वाटप करा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे व विहिरीचे, घराचे पंचनामे करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद आणि परिसरात (Heavy rain in Aurangabad) सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी (Farmers in Rural Area) यामुळे खूप चिंताग्रस्त आहेत. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न करता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांच्या वतीनेही यासाठी ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत.
प्रहार संघटनेचं पाण्याच्या टाकीवर आंदोलन
औरंगाबादमधील शेकटा येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. बुधवारी दुपारी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. औरंगाबादमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट २० हजारांची आर्थिक मदत करा, शेकटा मध्यवर्ती बँक सोसायटी नवीन सभासदांना कर्ज वाटप करा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे व विहिरीचे, घराचे पंचनामे करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
आंदोलनस्थळी करमाड पोलिसांचा बंदोबस्त
शेकटा येथील या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्ष औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुधाकर शिंदे,खालेद पठान, जावेद शहा यांनी केले. दरम्यान आंदोलन स्थळावर काही गैरप्रकार घडू नये यासाठी करमाड पोलिसांमार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरात खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांतून वाट काढत वाहन चालवताना चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जळगाव रोडवरील सबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे बोथट संवेदनांचे पित्र पूजन आंदोलन केले.
अन्यथा खड्ड्यात आणून बसव- मनसेचा इशारा
स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या औरंगाबादेतील रस्त्यांची अशी अवस्था अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हातात खड्ड्यांचे फलक दाखवून, हीच का तुमची स्मार्ट सिटी, असा सवाल करीत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. या आंदोलनात सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अब्दूल रशीद खान, अशोक पवार पाटील, संतोष कुटे, नंदू नावपुते, अभय मांजरामकर,,गणेश साळुंके ,संदीप दांडगे, मनोज भिंगारे, राजू चव्हाण, बाबुराव जाधव, रुपेश शिंदे, चेतन पाटील, विशाल इराळे पाटील, प्रवीण मोहिते, राहुल कुलकर्णी, रवी गायकवाड, नितीन इंचुरकर, प्रशांत जोशी,कृष्णा घायट पाटील आदिंनी सहभाग नोंदविला.
इतर बातम्या-
Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी