प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, मजारीवर चादर चढवली, पाहा EXCLUSIVE VIDEO

| Updated on: Jun 17, 2023 | 5:54 PM

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या कृतीवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, मजारीवर चादर चढवली, पाहा EXCLUSIVE VIDEO
Follow us on

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात याचा अंदाज बांधणं सध्याच्या घडीला कठीण झालं आहे. कारण घडामोडीच तशा घडू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरुन आता वेगवेगळ्या चर्चा होऊ शकतात.

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या मजारीला भेटीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीला वाकून फुले वाहताना दिसत आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर चादर देखील चढवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय मैत्री केली आहे. ठाकरे गटाची याबाबत असलेली भूमिका सर्वश्रूत आहे.

हे सुद्धा वाचा

असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर फुले वाहिली आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीमुळे ठाकरे गट देखील राजकीय कोंडीत अडकू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाकरे गटाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

‘औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?’

“औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलंय की, जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या-राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घालाना, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संबंधित प्रश्न उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर यांचा शिंदे-फडणवीसांना टोला

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट स्टेटसला ठेवली म्हणून वाद निर्माण झाला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय होऊ देता म्हणून होतो”, अशी प्रतिक्रिया दिली.