औरंगाबादेत खासगी कंपनीने सुरु केल्या दोन ई-बस, एंड्रेस अँड हाऊजर कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी खास सुविधा
कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या दोन बसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. या वेळी बसवरील निळा कपडा हटवण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी नवीन बसचे स्वागत केले.
औरंगाबाद: वाळूज औद्योगिक वसाहतीतील एंड्रेस अँड हाऊजर (Endress+Hauser (India) Pvt. Ltd.) कंपनीने ‘गो ग्रीन’ संकल्पना राबवून मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्या. हा उपक्रम अन्य कंपन्यांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सचिव मुख्य सचिव (उद्योग) बलदेवसिंग (BaldevSingh) यांनी येथे केले. औद्योगिक क्षेत्रात सध्या ग्रो ग्रीन संकल्पना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात रिन्युएबल एनर्जी, सोलर एनर्जी, ग्रीन एनर्जी या क्षेत्रात भविष्यात अनेक सामंजस्य करार होणार आहेत. नुकतेच जीएसडब्ल्यू कंपनीशी करार झाला आहे, अशी माहितीही बदलेदव सिंग यांनी दिली.
ई-बसचे थाटात उद्घाटन
एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) कंपनीत मंगळवारी मोठ्या थाटात या बसचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीत झालेल्या कार्यक्रमास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, स्वित्झरलँड येथील कौन्सिल जनरल ओथमार हर्डेगर, बजाजचे सी.पी. त्रिपाठी, उद्योगपती उल्हास गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला संबंधित ग्रुपचे सीओओ डॉ. अँड्रियास मेयर, सीईओ डॉ. मिर्की लेहमन यांची ऑनलाइन उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या दोन बसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. या वेळी बसवरील निळा कपडा हटवण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी नवीन बसचे स्वागत केले.
औद्योगिक क्षेत्रात गो ग्रीन मोहीम जोरात
एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक कंपनीने घेतलेल्या या पुढाकाराविषयी तसेच एकूणच औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील गो ग्रीन मोहिमेविषयी उपस्थितांनी मते व्यक्त केली. कर्मचाऱ्यांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्या. हा उपक्रम अन्य कंपन्यांसाठी आदर्शवत आहे. औद्योगिक क्षेत्रात सध्या ग्रो ग्रीन संकल्पना राबवण्यात येत आहे. याशिवाय अनेक सामंजस्य करारांची अंमलबजावणी होणार आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सचिव मुख्य सचिव (उद्योग) बलदेवसिंग यांनी येथे केले. उद्योगपती उल्हास गवळी म्हणाले, एंड्रस अँड हाऊजर कंपनी औरंगाबाद येथे आणताना या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगो होते. के. कुमार यांनी गाे ग्रीन संकल्पनेविषयी माहिती दिली. महाराष्ट्रात स्वित्झर्लंडच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांना मेक इन इंडिया अंतर्गत प्रोत्साहन मिळत आहे. नरेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, वैदेही कोडापे यांनी सूत्रसंचालन तर एन.श्रीराम यांनी आभार मानले.
मनपा उभारणार सात चार्जिंग स्टेशन
येत्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी तयारी सुरु केली आहे. महापालिकेवरील आगामी पदाधिकाऱ्यांची वाहने पर्यावरणपूरक असावीत, प्रदूषणमुक्त असावीत, असा प्रयत्न केला जात आहे. तसेच त्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या ई-कार खरेदी केल्या जाणार आहेत. या कारच्या चार्जिंगसाठी शहरात सात चार्जिंग सेंटरही उभारली जाणार आहेत, अशी माहिती मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी दिली.
इतर बातम्या-
स्मार्ट सिटी औरंगाबादेत व्यावसायिक नळांना मीटर, पाच इलेक्ट्रिक कार, वाचा बैठकीतील ठळक मुद्दे
Jandhan Account: फक्त एक मिस कॉल द्या आणि जाणून घ्या तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स