Railway: परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण नाहीच, औरंगाबाद-मनमाड सर्वेक्षणाला मंजुरी, रेल्वेमंत्र्यांची माहिती
औरंगाबादः मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या परभणी-मनमाड (Parbhani Manmad) या 291 किमी अंतराच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) रेड सिग्नल दिला आहे. या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने सध्या तरी दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी ही माहिती दिली. […]
औरंगाबादः मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या परभणी-मनमाड (Parbhani Manmad) या 291 किमी अंतराच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) रेड सिग्नल दिला आहे. या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने सध्या तरी दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी ही माहिती दिली. मात्र त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या 98 किमी मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दुहेरीकरणामुळे अडचणी कमी होतील
रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच रेल्वेचा वेगही वाढतो. एकेरी मार्गावर एखादे रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हे प्रकार थांबण्यासाठी मार्गांचे दुहेरीकरण आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर परभणी ते मनमाड स्थानकांदरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला. लोकसभा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले.
‘रेल्वे अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक’
दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या नकारात्मक निर्णयामुळे परभणी-मनमाड मार्ग दुहेरीकरणापासून वंचित राहिला आहे. एकेरी मार्गावर 100 टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे धावतात असं एकिकडे म्हटलं जातं तर दुसरीकडे प्रवासी नाहीत, असा दावा करत नुकसान होईल असा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवतात, असास आरोप मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी केला आहे.
इतर बातम्या-