Aurangabad Weather: शहरात पावसाचा शिडकावा, वातावरणात गारवा, पुढचे 3 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

आज शहरातील तापमान सुमारे 25 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण 84% असल्याने उकाडा कमी होऊन गारव्याची अनुभूती मिळतेय. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 किमी एवढा राहिल.

Aurangabad Weather: शहरात पावसाचा शिडकावा, वातावरणात गारवा, पुढचे 3 दिवस मध्यम पावसाचा अंदाज
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 1:37 PM

औरंगाबाद: शहर आणि परिसरात आज पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे परतीच्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या औरंगाबादकरांना (Aurangabad city) काहीसा दिलासा मिळाला. आजचे वातावरण काहीसे थंड आणि वातावरण ढगाळ आहे. पुढचे काही दिवस असेच हवामान राहिल, तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार होण्यारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 2, 3 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

आजचे वातावरण 25 अंश सेल्सियस

शहरातील एमजीएम अंतराळ विज्ञान केंद्राच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज शहरातील तापमान सुमारे 25 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण 84% असल्याने उकाडा कमी होऊन गारव्याची अनुभूती मिळतेय. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 किमी एवढा राहिल.

परतीच्या पावसाकडून अपेक्षा

यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला असला तरी औरंगाबाद जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याचेच चित्र होते. 16 ते 22 ऑगस्टदरम्यान संततधार पाऊस झाल्याने या परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर मात्र पावसानं विश्रांती घेतली होती. आता परतीचा पाऊसही काही कायम रहावा, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

30 लघु प्रकल्प अद्याप कोरडेच

मान्सूनचे तीन महिने संपत आले असून काही भागात परभणी, नांदेड, हिंगोलीत यंदा भरपूर पाऊस पडला असला तरीही काही जिल्ह्यात पावसाने नाराजी दर्शवली. त्यामुळे मराठवाड्यातील 879 पैकी 30 लघुप्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके तगली असली तरीही काढणीस आलेले मूग, उडीद पिकांचे वुकसान झाले.

मराठवाड्यात पावसाची असमानता

मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये 1 ते 27 ऑगस्टपर्यंत सरासरी 488.6 मिमीच्या तुलनेत 589.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. म्हणजेच 120.6 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तरीही मंडळ, गाव आणि तालुकानिहाय पावसाचे प्रमाण 50 ते 90 टक्क्यांदरम्यान कमी-जास्त आहे. तसेच कमी पाऊस झालेल्या भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बरसणार 

मराठवाड्यात मान्सूनच्या सुरुवातीला विविध भागात असमानता दिसून आली. मात्र आता परतीचा पाऊस कसा पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सुरु होईल. मध्य व दक्षिण भारतात तो ऑक्टोबरच्या पंधरवाड्यानंतरही सुरूच राहील. उत्तर भारतात कमी पावसाचा अंदाज आहे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, कर्नाटकसह संपूर्ण दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. (Rain and weather update in Aurangabad, Maharashtra, IMD)

इतर बातम्या: 

Weather Update today : राज्यात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरु

Vaccine Update: दुसऱ्या डोसची तारीख लक्षात आहे ना? जाणून घ्या औरंगाबादेत किती जणांचे झाले दोन्ही डोस पूर्ण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.