Corona Updates: कर्मचाऱ्याचे लसीकरण न झाल्याने औरंगाबादमधील प्रसिद्ध राज क्लॉथ सील!
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत खासगी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन्ही डोसची सक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचारी व कामगारांची तपासणी करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले आहेत.
औरंगाबादः कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेने सर्वत्र कठोर नियमावली लागू केली आहे. याअंतर्गत शहरातील आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. महापालिकेची पथकं सदर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात तैनात आहेत. या वेळी जालना रोडवरील राज क्लॉथ सेंटरमधील एक कर्मचारी लस न घेतलेला आढळला. त्यानंतर कामगार विभाग आणि मनपाच्या पथकाने गुरुवारी या दुकानाला सील केले.
कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस अनिवार्य
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत खासगी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन्ही डोसची सक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचारी व कामगारांची तपासणी करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले आहेत. त्यानुसार विभागाचे सहाय्यक आयुक्त युवराज पडियाल आणि मनपाचे वॉर्ड अधिकारी संपत जरारे यांनी गुरुवारी राज क्लॉथ सेंटरमधील कामगारांची तपासणी केली. तेव्हा हाऊस कीपिंगडे काम करणाऱ्या एकाने लस घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर हे दुकान सील करण्यात आले. यापूर्वी जवाहर कॉलनीतील सहा दुकानांना दंड ठोठावण्यात आला होता. दरम्यान, दुकानातील हाऊस कीपिंगचे काम एका कंपनीला देण्यात आले असून ते दर आठ दिवसांनी कर्मचारी बदलतात. त्यामुळे ही संबंधित कंपनीची चूक आहे. याचे हमीपत्र द्यायला कंपनी तयार असल्याने दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती संचालक अनिल केलानी यांनी केली आहे.
इतर बातम्या-