Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना

Raj Thackeray Maharashtra Din Meet : 'रमजान ईदनंतर 3 'मे'ला राज ठाकरेंनी सभा घ्यावी' असं औरंगाबाद पोलिसांनी म्हटलंय.

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना
राज ठाकरेंची जबरदस्त अंदाजात एन्ट्री होणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 8:24 AM

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेची (Raj Thackeray Aurangabad) तारीख बदला अशी सूचना औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आल्याचं कळतंय. ‘रमजान ईदनंतर 3 ‘मे’ला राज ठाकरेंनी सभा घ्यावी’ असं औरंगाबाद पोलिसांनी म्हटलंय. औरंगाबाद पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना औरंगाबाद पोलिसांकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरेंची सभा व्हावी, यासाठी मनसेचे (Aurangabad MNS) पदाधिकारी आग्रही आहोत. याठिकाणी तब्बल एक लाख लोक जमतील, अशी अपेक्षा मनसेच्या वतीने करण्यात येतेय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा गरवारे स्टेडियमवर (Garware Stedium) घेता येईल का, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती गुरुवारी समोर आली होती.

औरंगाबाद शहरातील इतरही मैदानांचा पर्याय तपासून पाहिला जात असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जाहीर केल्याप्रमाणे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल, अशी आग्रही भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यावर पोलिसांनी आता नवा युक्तिवाद शोधून काढला आहे. नियोजित ठिकाणीच सभा घ्यायची असेल, तर सभा महाराष्ट्र दिना ऐवजी रमजान ईदनंतर घ्यावी, असं पोलिसांकडून सुचवण्यात आलंय.

पोलिसांनी असं का आवाहन केलं?

मनसेनी सभेचं ठिकाण न बदलण्याचा निर्णय घेतलाय. रमजान ईदला सभा झाली, तर तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी सभेची तारीख बदलण्याची सूचना मनसेच्या एका कार्य़कर्त्याला फोन करुन केली होती. त्यानंतर आता ही सूचना मनसेकडून मान्य केली जाते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

मनसे कार्यकर्त्यानं काय म्हटलं?

दरम्यान पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतरही मनसे महाराष्ट्र दिनीच सभा घेण्यावर ठाम आहे. ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्याची भूमिका मनसेनं आधीपासून घेतली होती. आता पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र तूर्तासतरी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून सभेच्या आयोजनाच्या अनुशंगानं तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ :

सभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं

दरम्यान, औरंगाबादेत सध्या राज ठाकरेंच्या नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलंय. गुरुवारी औरंगाबाद शहरातील काही भागात राज ठाकरे यांनी पूर्वी काढलेल्या व्यंगचित्राचे पोस्टर उभे करण्यात आले होते. शिवसेनेचे नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांनी ते सोशल मीडियावर शेअरदेखील केले. मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत, काही भागातील पोस्टर्स काढून टाकण्यात आले.

दरम्यान, अद्यापतरी राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. ही परवानगी दिली जाते की नाही, यावरही सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर परवानगी दिली गेली नाही, तर कोर्टाची पायरी चढू, अशा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.