Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरेंवर एक चकारही शब्द नाही, वाचा भाषणातले 10 मोठे मुद्दे

Raj Thackeray : माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सर्व काय फडफडायला लागेल. शरद पवार म्हणतात दोन समाजात हे दुही माजवत आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरेंवर एक चकारही शब्द नाही, वाचा भाषणातले 10 मोठे मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 9:54 PM

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजच्या भाषणातून पुन्हा एकदा भोंग्याचा राग आळवला. राज यांनी आजच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj), त्यांच्यापूर्वीचा काळ आणि नंतरचा काळ यावर भाष्य केलं. त्यानंतर जेम्स लेन प्रकरण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची करण्यात आलेली बदनामी, शरद पवार (sharad pawar) यांच्यावरील टीका, प्रबोधनकारांनी नेमकं काय सांगितलं होतं आणि भोंग्यावरून राज्य सरकारला दिलेला इशारा… आदी मुद्द्यांना राज ठाकरे यांनी हात घातला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला भोंगे उतरवण्यासाठी नवा अल्टिमेटमही दिला. मात्र, या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चकार शब्दही काढला नाही. शिवसेनेवरही टीका केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील दहा मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश…

राज यांच्या भाषणातील दहा मुद्दे

  1. ठाण्यातील सभेनंतर दिलीप धोत्रेंनी सांगितलं संभाजीनगरला सभा घेऊया. संभाजी नगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं सभा घेऊ. पण तारीख सांगतो नंतर. हा विषय संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. या पुढच्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. विदर्भातही जाणार आहे. कोकणात, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही फायदा नाही. मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवायचं थोडचं राहतं. सूर्य उगवतोच, असं राज ठाकरे म्हणाले.
  2. महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. कच्चेबच्चे आहेत ते राजकारण्याकंडून काय शिकत असतील. हे राजकारण आहे. हा आपला महाराष्ट्र आहे. या देशाने देशाला विचार दिला. बुद्धीझम, हिंदुइझम समाजवाद आणि कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रातून गेला. आणि हे राजकारणी काहीही बोलत आहेत. त्यावर आपण हसतोय. रोज महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. त्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा करायचा का? त्यातून काहीच प्रेरणा घ्यायची नाही का? आज काय महाराष्ट्राची हालत केलीय. आई बहिणीवर शिव्या घालत आहेत. कुणी मुद्द्यावर बोलत नाही. गुद्द्यावर बोलतात. तरुणांना काय शिकवतोय हुल्लडबाजी? राज ठाकरेंचं भाषण आहे. हल्लागुल्ला करा निघा. इथेच मरतो आपण. आपल्या हाताला काही लागत नाही या राजकारण्यांना तेच हवंय.
  3. हे सुद्धा वाचा
  4. माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सर्व काय फडफडायला लागेल. शरद पवार म्हणतात दोन समाजात हे दुही माजवत आहे. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. मी दुही माजवतोय. पवारसाहेब तुम्ही जाती जातीत जे भेद निर्माण करताय त्यातून भेद निर्माण होतोय. हातात पुस्तक घेऊन त्यावर लेखकाचं नाव बघून प्रतिक्रिया देतात. मी बोलल्यानंतर आता शिवाजी महाराजंचं नाव घेत आहेत. काही तरी व्हिडीओ काढताय. तल्लीन झालेत. गीतरामायण ऐकत आहेत. बाजूला शिवाजी महाराजंचं पुस्तक ठेवतात. तल्लीन झाले. कशाला खोटं करता?. मी म्हटलं पवार नास्तिक आहेत. नंतर देवाचे फोटो काढायला लागले. कशाला फोटो काढता? तुमची कन्या लोकसभेत म्हणाली माझे वडील नास्तिक आहेत.
  5. मला माझ्या आजोबाची पुस्तक वाचा असं ते सांगत आहेत. मी वाचलीत. तुम्ही सर्व पुस्तकं वाचा. माझ्या आजोबांनी जे लिहिलीय ते त्याकाळातील संदर्भाने होतं. व्यक्ती सापेक्ष होतं. ते हिंदू धर्माची पुजा करायचे. माझे आजोब भट भिक्षूकीवर टीका करणारे होते. धर्म मानणारे होते.
  6. पवार साहेब, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वाचू नये. हे विष या माणसाने कालवलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष सुरू झाला. मराठा बांधव भगिनींची माथी भडकवायची. जेम्स लेन सारखा माणूस उभा करायचा त्याने काही लिहिल्यावर त्यावरून माथी भडकवायची. ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांच्या वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. कशासाठी तर ते ब्राह्मण म्हणून. आम्ही जात मानत नाही. बघितली नाही. त्याच्याशी घेणं देणं नाही. मी व्यक्ती बघतो. जात बघून पुस्तकंही वाचत नाही. रायगडावरील समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पााहणार का? टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचं नाव काय मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाही.
  7. ज्यावरून दहा पंधरा वर्ष तुम्ही राजकारण केलं तो जेम्सलेन म्हणतो मी कुणालाही भेटलो नाही. तुम्ही केंद्रात होता. कृषी मंत्री होता का त्याला फरफटत आणलं नाही? कशासाठी हे विष पाजलं. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही यात तुम्ही रामदास स्वामींची जात पाहत आहात का? रामदास स्वामी कधी बोलेले मी शिवाजी महाराजांचं गुरु आहे? शिवाजी महाराज कधी बोलले रामदास स्वामी माझे गुरु आहेत? का? मग कशासाठी?
  8. रामदास स्वामींनी जे शिवाजी महाराजांवर लिहिलं ते अप्रतिम आहे. असं मी कधी वाचलं नाही. पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महापुरुषांनी शिवाजी महाराजांचेच विचार पुढे नेले. त्यांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. आता फोटो लावत आहेत. मी जात मानत नाही. मी ब्राह्मणांची बाजू घेऊन बोलत नाही.
  9. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. तो धार्मिक विषय नाही. त्याला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्माने द्यावं लागेल. एवढं लक्षात ठेवावं. इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही?
  10. किती मशिदींकडे परवानगी आहे? कुणाकडेच नाही. मला कोणी तरी सांगितलं. संभाजीनगरात 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे, अख्ख्या देशभर हेच आहे. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली यावे. सर्वांना समान धर्म असला पाहिजे. आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे, असं सांगितलं जातं. शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत? यांना कुठेही. रस्त्यावर उतरून नमाज पढतात. कुणी अधिकार दिला?
  11. शासनाला विनंती. आज तारीख 1, उद्या तारीख 2, 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागला पाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही, असंही ते म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.