औरंगाबादः महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अत्यंत सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली. औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. एसटीसारख्या (ST Strike) अत्यंत जुन्या आणि ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या संस्थेविषयी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, मात्र याऐवजी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोघेही या प्रश्नात हात धुवून घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने ही मागणी मान्य न करता त्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. कर्मचारीदेखील आपल्या मागणीवर अडून आहेत. राज्य सरकारने या आंदोलनामुळे असंख्य कर्चमाऱ्यांचं निलंबन केलंय. या प्रश्नावर तुमचं काय मत आहे, याविषयी राज ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, एक लाख कर्मचारी एकदम सरकारच्या अंगावर आले तर काय करणार सरकार. चार चार महिने त्यांचे पगार होत नाहीत. ऐन दिवाळीत कर्चमाऱ्याच्या घरी पगार नाही झाले. बाकीच्यांचे पगार होतात. मग कर्मचाऱ्यांचे का नाहीत? 1960 सालातली ही एवढी जूनी संस्था आहे. तिच्यातला भ्रष्टाचार थांबला तर निश्चितच संस्था पुढे येईल. याविषयी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील बोललो आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमली पाहिजे. या कंपनीच्या देखरेखीखाली सर्व कारभार चालेल. कर्मचाऱ्यांनीही हा विषय जास्त जाणू नये. पण कुणीही यात समजून घ्यायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही हात धुवून घ्यायचे ठरवले आहे.”
पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचं प्रकरण सुरु केलंय. केंद्रानं मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-