Rare Bird: औरंगाबादेत प्रथमच दिसला आमूर ससाणा, 22 हजार किमी प्रवास करून मंगोलियातून आफ्रिकेत जातो

औरंगाबादः हिवाळा लागताच असंख्य युरोपियन पक्षी भारतासारख्या उष्णकटिबंदीय प्रदेशाकडे स्थलांतर करु लागतात. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात असंख्य विदेशी पाहुणे औरंगाबाद परिसरातही पहायला मिळतात. जायकवाडी जलाशयावर तर अशा पक्षांचे थवेच्या थवे दिसतात. त्यामुळे हा काळ पक्षीप्रेमींसाठी पक्षी न्याहाळण्याकरिता जणू पर्वणीच असतो. औरंगाबादमधील पक्षीप्रेमींना नुकताच एक पक्षी पहिल्यांदाच शहरात आढळून आला. नागालँड सरकारने खास […]

Rare Bird: औरंगाबादेत प्रथमच दिसला आमूर ससाणा, 22 हजार किमी प्रवास करून मंगोलियातून आफ्रिकेत जातो
औरंगाबादेत दिसलेला देखणा आमूर ससाणा
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:20 AM

औरंगाबादः हिवाळा लागताच असंख्य युरोपियन पक्षी भारतासारख्या उष्णकटिबंदीय प्रदेशाकडे स्थलांतर करु लागतात. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात असंख्य विदेशी पाहुणे औरंगाबाद परिसरातही पहायला मिळतात. जायकवाडी जलाशयावर तर अशा पक्षांचे थवेच्या थवे दिसतात. त्यामुळे हा काळ पक्षीप्रेमींसाठी पक्षी न्याहाळण्याकरिता जणू पर्वणीच असतो. औरंगाबादमधील पक्षीप्रेमींना नुकताच एक पक्षी पहिल्यांदाच शहरात आढळून आला. नागालँड सरकारने खास संरक्षण दिलेल्या या पक्ष्याचे भारतीय नाव आमूर ससाणा असे आहे.

मंगोलियन पक्षी चीन, सायबेरिया, भारतातून आफ्रिकेत जातो

पक्ष्यांचे गाढे अभ्यासक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक तसेच डॉ. विक्रांत पाटणकर यांना औरंगाबादेत वेरूळ परिसरात हा पक्षी दिसून आला. कबुतराच्या आखाराचा हा पक्षी 25 ते 32 सेंटीमीटर लांब आहे. शहरात दिसला त्यावेळी हा देखणा पक्षी तारेवर बसून शेत पिकातील किडे खाण्यात मग्न होता. प्रथमदर्शनी हा पक्षी युरशियन हॉबी असावा असे डॉक्टर पाठक यांना वाटले आणि त्याचे अनेक छायाचित्रे टिपली. नंतर ही छायाचित्रे तज्ञांना पाठवून त्यांच्याकडून हा पक्षी अमूर फाल्कन आहे असे निश्चित केले. हा पक्षी प्रथमच आपल्या भागात दिसला आहे. हा पक्षी स्थलांतरित असून मंगोलिया चीन सायबेरिया येथून प्रवास सुरू करून भारता मार्गे आफ्रिकेला हिवाळा घालवण्यासाठी जातो.

नागालँड सरकारकडून विशेष संरक्षित

भारतामध्ये नागालँडमध्ये या पक्षाचा दोन ते तीन आठवडे मुक्काम असतो. नागालँडपर्यंत जाताना हा पक्षी महाराष्ट्रात पुणे, मुंबई व काही भागात थोडे दिवस पंथस्थ म्हणून दिसून येतो. 22,000 किलोमीटरचा विक्रमी प्रवास हा पक्षी मंगोलिया ते आफ्रिका आणि पुन्हा वापस असा करत असतो. हा ससाणा मंगोलिया चीन आणि रशिया या अमर नदीच्या भागांमध्ये वीण घालत असतो. नागालँड परिसरात मुक्कामाला असताना या पक्षाची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे. परंतु वनविभाग पक्षीमित्र निसर्ग संस्था यांच्या प्रयत्नाने स्थानिकांचे प्रबोधन करून आता या पक्षांच्या हत्या थांबवल्या आहेत. नागालँड सरकारने या पक्षाला संरक्षण दिले आहे.

आमूर ससाण्याची वैशिष्ट्ये काय?

हा देखणा पक्षी कबूतराएवढा असून त्याचा रंग राखाडी करडा असतो. शेपटी व मांडी तांबूस रंगाची असते.डोळ्या भोवतीची कडा,डोक्याचा मागचा भाग व पाय नारंगी तांबूस रंगाचे असतात.मादीच्या पोटावर छातीवर का रंगाचे ठिपके असतात. नाकतोडे टोळ व कीटक हे या पक्ष्याचे अन्न आहे.

इतर बातम्या-

bull market boomed again| बेल्हेचा बैल बाजार पुन्हा गजबजला ; खिलार जातीच्या बैलांच्या मागणीत वाढ

‘कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा डाव’ राष्ट्रवादी आक्रमक

वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.