औरंगाबादेत उद्या 75 तास पोहण्याचा उपक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता, ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत उपक्रम
औरंगाबाद: महानगरपालिकेतर्फे (Aurangabad Municipal corporation) भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrut Mahotsav) साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात उद्या 30 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव येथे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) […]
औरंगाबाद: महानगरपालिकेतर्फे (Aurangabad Municipal corporation) भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrut Mahotsav) साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात उद्या 30 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव येथे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांच्या हस्ते सकाळी 9.00 वाजता या उपक्रमाचे उदघाटन होईल.
जलतरणपटूंच्या दोन टीम करणार विक्रम
औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ जलतरण तलाव येथे या उपक्रमाला सुरुवात होईल. यातील जलतरणपटूंमध्ये औरंगाबाद पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम हे एका संघाचे नेतृत्न करतील . तर विष्णू लोखंडे हे दुसऱ्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दोन्ही संघात अनुक्रमे रुस्तुम घुगे, रामेश्वर सोनवणे, कदिर खान, एकनाथ मगर , वसंत पवार , सुदाम औताडे, गोपीनाथ खरात व राजेश भोसले या जलतरणपटू विक्रमवीरांचा समावेश आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही होणार आहे.
‘अमृत महोत्सव’अंतर्गत रुग्णांना ब्लँकेट वाटप
‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त शहरात स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी लायन्स क्लब नेत्र रुग्णालय एन -१ सिडको येथे सकाळी 10.30 वाजता आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. त्यांनी लायन्स क्लब नेत्र रुग्णालयाला भेट देऊन तेथील अत्याधुनिक सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या नेत्र रुग्णांशी त्यांनी संवाद साधून तेथील अत्याधुनिक सोयी सुविधा बद्दल रुग्णालयाचे कौतुक केले. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
भिंतीवरील रंगरंगोटीची पाहणी केली
आज बुधवारी, आयुक्त पाण्डेय यांनी सिडको जळगाव मुख्य रस्त्यापासून पायी चालत एन -१ सिडको येथील औरंगाबाद चिकलठाणा लायन्स क्लब नेत्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या बाजूने असलेल्या भिंतीवर होत असलेल्या रंगरंगोटी, पेंटिंग ,आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने रेखाटण्यात आलेल्या चित्राची पाहणी करून काही सूचना व मार्गदर्शन केले तसेच रुग्णालायाच्या बाजूला असलेल्या उद्यानाची व परिसराची पाहणी केली.
इतर बातम्या-
Marathwada rain : आधीच पावसानं धुतलं, त्यात जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती