अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई

पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, रंगार गल्ली, शहागंज, सराफा व सिटी चौक या सर्व भागात रस्त्यावर थांबून हात गाड्यावर साहित्य विक्री करणे, वाहतूकीला अडथळा करणे अशा अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई
पैठण गेट परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:28 PM

औरंगाबादः शहरातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पैठण गेट (Paithan Gate Aurangabad) परिसरात असंख्य लहान-मोठी दुकाने थाटलेली आहेत. मात्र पैठण गेटभोवतीच (Aurangabad market) अनेक हातगाड्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी पैठण गेट सभोवतालचे हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. याप्रकरणी पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी महानगरपालिका व वाहतूक पोलिस प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण हटाव पथकाची कामगिरी

दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथक आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, रंगार गल्ली, शहागंज, सराफा व सिटी चौक या सर्व भागात रस्त्यावर थांबून हात गाड्यावर साहित्य विक्री करणे, वाहतूकीला अडथळा करणे अशा अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पैठण गेट परिसरातून एकूण पंधरा ते सतरा हातगाड्या, रंगार गल्ली येथून एक पाणीपुरीची गाडी, एक साधी गाडी जप्त करण्यात आली. शहागंज परिसरातून रस्त्यावर प्लास्टिकचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते ते निष्कासित करण्यात आले.

गुलमंडी रस्त्यावरील सर्वच टेबल जप्त

गुलमंडी रस्त्यावरही हातगाड्यांची असंख्य दुकाने थाटलेली असतात. यामुळे बाजारपेठातील रस्ता अत्यंत अरुंद होतो. ग्राहकांना येथून वाहने चालवणे अन् पायी चालणेही कठीण जाते. त्यामुळे कालच्या कारवाईत गुलमंडी भागातून पूर्ण रस्त्यावर लावण्यात आलेले टेबल जप्त करण्यात आले. सराफा येथील दोन व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध दुकानासमोर लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते ते काढण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरातील पूर्णपणे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कोमे, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी कारवाईत सहभाग घेतला.

इतर बातम्या-

औरंगाबादच्या बाजारात परराज्यातील लाल मातीच्या आकर्षक पणत्या दाखल, स्थानिकांचा लक्ष्मी मूर्ती बनवण्यावर भर

सिडको वाळूज महानगराचे औरंगाबाद महापालिका हस्तांतरण कामाला वेग, सुविधांचे होणार संयुक्त सर्वेक्षण

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.