संभाजीराजे हे उद्धव ठाकरेंचे मित्र, मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा: विनायक मेटे
दीड महिना झाला आरक्षण रद्द होऊन ठाकरे सरकारने एकही पाऊल उचललं नाही, ही सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली आहे. | Vinayak Mete
औरंगाबाद: संभाजीराजे छत्रपती यांचे महाविकासआघाडी सरकारशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे आता संभाजीराजे (SambhajiRaje Chhatrapati) यांनीच सरकारवरील दबाव वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले. (Vinayak Mete take a dig on CM Uddav Thackeray over Maratha Reservation)
ते रविवारी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी 26 जून रोजी औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीचा पहिला मेळावा घेणार असल्याची घोषणा केली. हा मेळावा राज्य सरकारचे वाभाडे काढणारा असेल. शासनावर आमचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. दीड महिना झाला आरक्षण रद्द होऊन ठाकरे सरकारने एकही पाऊल उचललं नाही, ही सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली आहे. याचा संताप मराठा समाजाच्या तरुण पिढीत पाहायला मिळत आहे, त्याच प्रतिबिंब बीडच्या मोर्च्यात पाहायला मिळालं आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री घाईघाईने दिल्लीला गेले आणि मराठा आरक्षणाबाबत काहीतरी करतोय असं नाटक करण्याचं काम त्यांनी केलं, बाकी काहीही त्यांनी काहीही केलेलं नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
राज्यभरात मराठा आरक्षण संघर्ष समितीचे दौरे
आम्ही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर दौरा सुरू केल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत, त्यानंतर संपुर्ण राज्यातील जिल्ह्यात मेळावे घेणार आहोत त्यानंत सर्व जिल्ह्यात आम्ही मोर्चे काढणार आहोत. हे मूक आंदोलन नसेल हे बोलकं आंदोलन असणार आहे, सरकारला धारेवर धरणार आणि न्याय मागणारे आंदोलन असेल. मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पाच लोकांची कायदेशीर समिती नेमली जाईल. त्यांचा अहवाल घेऊन त्यानुसार कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत. 5 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
‘प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनाची स्थापन करा’
या पत्रकारपरिषदेत विनायक मेटे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनाची स्थापन करा, अशी मागणी केली. उध्दव ठाकरे यांनी मराठा अरक्षणकडे गांभीर्याने पाहावं. अन्यथा नक्षलवाद्यांनी टाकलेल्या डावाला प्रतिसाद मिळणार नाही, असं होणार नाही असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. जे नक्षलवाद्यांना कळलं आहे ते उध्दव ठाकरे यांना कधी कळणार, अशी खोचक टिप्पणीही विनायक मेटे यांनी केली.
संबंधित बातम्या:
मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, संभाजीराजे छत्रपती म्हणतात…
Maratah Reservation: ‘मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे’
(Vinayak Mete take a dig on CM Uddav Thackeray over Maratha Reservation)