‘जयभीम’ पाहिला, आवडला, मीसुद्धा नव्या चित्रपटांवर काम करतोय, काय म्हणाले संजय राऊत?

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'मी जयभीम चित्रपट पाहिला. चित्रपट मला खूप आवडला.' जय भीम या शब्दाविषयी बोलताना ते म्हणाले, अनेकांना जयभीम हा जातिवाचक शब्द वाटतो. पण मला मात्र हा शब्द कायद्याचा विजय वाटतो. ही फिल्म सर्वांनी पहायला हवी.

'जयभीम' पाहिला, आवडला, मीसुद्धा नव्या चित्रपटांवर काम करतोय, काय म्हणाले संजय राऊत?
एमजीएम विद्यापीठात संवाद साधताना संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 5:53 PM

औरंगाबादः शहरात शिवसेनेचा भव्य मोर्चा काढणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठात (MGM University) विद्यार्थी आणि पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारणासह चित्रपट, पत्रकारिता तसेच मराठी भाषेविषयी त्यांचे अनुभव व्यक्त केले. एरवी राजकीय पक्ष आणि नेत्यांवर सडेतोड टीका करणाऱ्या राऊत यांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर दिलखुलासपणे आपली मते मांडली, विविध अनुभव सांगितले.

‘जयभीम’ चित्रपट आवडला…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘मी जयभीम चित्रपट पाहिला. चित्रपट मला खूप आवडला.’ जय भीम या शब्दाविषयी बोलताना ते म्हणाले, अनेकांना जयभीम हा जातिवाचक शब्द वाटतो. पण मला मात्र हा शब्द कायद्याचा विजय वाटतो. ही फिल्म सर्वांनी पहायला हवी. सिनेमा बनवाताना स्वातंत्र्य घेतलंय. पण आपल्या देशातील एका मोठ्या वर्गाला अद्याप स्वातंत्र्य माहित नाही, कायद्याची मदत मिळत नाही, त्याला राजकारण, मतदान माहिती नाही. अशा समाजातली एक व्यक्ती लढायला उभी राहते, आपल्यातलाच एक तरुण वकील ते शेवटपर्यंत घेऊन जातो.. असं हे कथानक आहे.

कुलाब्यातल्या छाबड हाऊसवर नवा चित्रपट करतोय..

ज्या विषयांवर चित्रपट बनवायला लोक धजावत नाहीत, असे विषय मी हातात घेतो. नवाजुद्दीन सिद्दीकी बनवला. चित्रपटांविषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मला चित्रपट बघायला आवडतात आणि बनवायलाही आवडतात. मी बाळासाहेबांवर चित्रपट बनवला आहे. त्यांच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हे माझे आदर्श आहेत. त्यांच्यावरही मी फिल्म बनवतोय. कुलाब्यात छाबड हाऊस नावाची ज्यु लोकांची जागा आहे. तिथे सगळ्यात महत्त्वाची जागा आहे. तिथे मोजे नावाचा इस्रायली मुलगा होता. त्यात त्याची आई-वडील या हल्ल्यात मारले गेले. या मुलाचं रेस्क्यू ऑपरेशन झालं. चार पोलिसांनी तब्बल 72 तासांची झुंज दिली. दिल्लीहून एनएसजी कमांडो आले आणि त्या मुलाची सुटका झाली. आपल्या पोलिसांचं शौर्य अप्रकाशित राहिलंय.. ज्या पोलिसांकडे कोणतीही शस्त्र उरली नव्हती. त्यांनी 72 तास अतिरेक्यांशी लढाई चालू ठेवली. त्या मुलाला नंतर इस्रायला घेऊन गेले. या कथानकावर मी नवा चित्रपट करतोय, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा खासदार संजय राऊत यांच्याशी मुक्तसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर तसेच एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके उपस्थित होत्या.

इतर बातम्या-

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

Video : कोव्हिड काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास, किरीट सोमय्यांचं ठाकरेंच्या दुखण्यावर बोट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.