केम छो वरळी, लुंगी डान्स त्यामुळेच मराठी माणसांवर… संजय शिरसाट यांचा ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्ला

मंत्रिमंडळ विस्तार बाबत माझं भाकीत खोटं ठरलं असे समजा. पुन्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटेल आणि भाकीत कधी वर्तवू असे विचारेल, अशी मिश्किल टिप्पणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली. शिरसाट हे मीडियाशी संवाद साधत होते.

केम छो वरळी, लुंगी डान्स त्यामुळेच मराठी माणसांवर... संजय शिरसाट यांचा ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्ला
sanjay shirsat Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 3:47 PM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 29 सप्टेंबर 2023 : मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी मुलीला ती मराठी असल्याच्या कारणावरून घर नाकारण्यात आलं. त्यावरून खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाने या प्रकाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. तर शिंदे गटाने या प्रकारावरून थेट ठाकरे कुटुंबावर टीका करत ठाकरे कुटुंबावर खापर फोडले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्द्यावरून ठाकरे कुटुंबावर घणाघाती हल्ला चढवला आहे.

केम छो वरळी यासारखे पोस्टर लावले, लुंगी डान्स कुणी केला? मतांसाठी लाचारी पत्करली म्हणून ही वेळ आली. मुंबई मराठी माणसाची आहे. घर नाकारण्यांवर कारवाई व्हायला हवी, असं संजय शिरसाट म्हणाले. तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबत असे झाले तर त्यावेळी पंकजा का बोलल्या नाहीत? त्याचवेळी त्या आक्रमक झाल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती, असंही ते म्हणाले.

पवारांना परिणाम माहीत

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यावरूनही शिरसाट यांनी टोलेबाजी केली. रोहित पवार यांच्या कारखान्यावर धाड आणि कारवाई ही नियमाने झाली आहे. कारवाई झाल्यानंतर 2 बड्या नेत्यांचे नावे घ्यायला हवीत. राजकिय पक्ष तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सर्व करत असेल तर त्यांची नावे घ्यावेत. शरद पवार यांना परिणाम माहीत आहेत म्हणून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले, असा टोलाही त्यांनी लगावला.

रोहित पवार टक्कर देऊ शकत नाही

अजित पवार यांना रोहित पवार टक्कर देऊ शकत नाही. उलट रोहित पवार यांनी उबाठा गटाकडून अजित पवार यांना टार्गेट करण्याची पद्धत घेतली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

एका दिवसात सर्व…

आज ओबीसी आरक्षणावर पर्याय काढण्यासाठी बैठक होत आहे. एका दिवसात सर्व होईल असं कुणी सांगितलं? सूचना घेतात. त्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग काढता येतो. ओबीसी आणि मराठा समाजाच्या बैठका होणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.

घरात बसण्यापेक्षा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घाणा येथे जात आहेत. आपली लोकशाही कुणी परदेशात सांगत असेल तर यात अभिमान असायला हवा. घरात बसण्यापेक्षा आणि मातोश्रीवर फेऱ्या मारण्यापेक्षा हे उत्तम आहे. लंडनला जाउन आराम करण्यापेक्षा घाण्याला जाऊन प्रबोधन करणे कधीही उत्तम, असा चिमटा संजय शिरसाट यांनी काढला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.